IND vs SA Test : बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया लढलीच नाही, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध लाजिरवाणा पराभव

IND vs SA Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताचा दारुण पराभव झाला आहे. भारतीय संघाचा पहिला डाव २४५ धावांवरच आटोपला होता. यामुळे दक्षिण आफ्रिकेला १६३ धावांची आघाडी मिळाली होती.
IND vs SA Test
IND vs SA Testcricbuzz
Published On

IND vs SA Test 3rd Day :

सेंच्युरियन येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघात पहिला कसोटी सामना झाला. या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा तिसऱ्या दिवशीच पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने ३२ धावांनी भारताचा पराभव केला. या पराभवाने दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगलं. भारतीय संघ दुसऱ्या डावात अवघ्या १३१ धावांत गारद झाला. दक्षिण आफ्रिकेचा संघ २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. (Latest News)

भारताकडून विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक ७६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) पहिल्या डावात ४०८ धावा केल्या. तर भारतीय संघाचा (Indian team) पहिला डाव २४५ धावांवरच आटोपला होता. यामुळे दक्षिण आफ्रिकेला १६३ धावांची आघाडी मिळाली होती. दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून खेळवली जाणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केपटाऊनमध्ये दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. भारतीय संघ केपटाऊन कसोटी जिंकून मालिका बरोबरीत संपवण्याचा प्रयत्नात असेल. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने सर्वाधिक ४ बळी घेतले. मार्को युनसेनने ३ भारतीय फलंदाजांना बाद केले. तर कागिसो रबाडाने टीम इंडियाच्या २ फलंदाजांना बाद केले.

कसोटीच्या पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सेंच्युरियनच्या उसळत्या खेळपट्टीवर भारतीय संघाच्या फलंदाजांचा आफ्रिकन वेगवान गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही. संपूर्ण टीम इंडिया फक्त २४५ धावा करू शकली. केएल राहुलने १०१ धावांची खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेलं होतं. राहुलशिवाय भारताचा कोणताही फलंदाज आफ्रिकन वेगवान गोलंदाजासमोर फार काळ टिकू शकला नाही. भारताने दुसऱ्या सत्रात मात्र ७६ धावा केल्या.

भारताचा डाव संपल्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४०८ धावा केल्या. तर भारतीय संघाचा पहिला डाव २४५ धावांवरच आटोपला होता.यामुळे दक्षिण आफ्रिकेला १६३ धावांची आघाडी मिळाली होती.

IND vs SA Test
IND W vs AUS W : भारतासाठी दुसरी वाईट बातमी; ऑस्ट्रेलियाकडून भारतीय महिला संघाचा पराभव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com