India Women vs South Africa Women, 3rd T20I x
Sports

IND W vs SA: चेन्नईत चालली पूजा-राधाच्या गोलंदाजीची जादू; द.आफ्रिकेचा संघ अवघ्या 84 धावात गारद

India Women vs South Africa Women, 3rd T20I : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यातील 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जातोय. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याकडे हरमनप्रीत कौरचे लक्ष असेल.

Bharat Jadhav

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यातील 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जातोय. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार हरप्रती कौरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पूजा वस्त्राकार आणि यादव यांनी योग्य ठरवला. या दोघांच्या गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची भंबेरी उडवली. दक्षिण आफ्रिकेचा संघा अवघ्या 84 धावांवर गारद झाला.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला चौथ्या षटकात पहिला धक्का बसला. श्रेयंका पाटीलने कर्णधार लॉरा वोल्वार्डला बाद केलं. तिचा झेल अरुंधती रेड्डीने घेतला. लॉराने 9 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 9 धावा केल्या. त्यानंतर 10 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर असलेल्या मारिजन कॅपला पूजा वस्त्राकरने बाद केलं. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 30 होती. त्यानंतर ठराविक अंतराने आफ्रिकेच्या संघाच्या विकेट पडत राहिल्या.

आज दक्षिण आफ्रिकेसाठी परिस्थिती खूपच खराब झाली. मागील दोन सामन्यांत आफ्रिकेची उत्कृष्ट फलंदाजी केली होती परंतु तिसऱ्या सामन्यात आफ्रिकेचा संघा सपशेल अपयशी ठरलाय. भारतीय महिला संघाने चोख क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट गोलंदाजी केली. भारताने मोठ्या शिस्तीने गोलंदाजी करत आफ्रिकेच्या संघाला दडपणाखाली ठेवलं. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संपूर्ण संघ 17.1 षटकांत केवळ 84 धावांत गारद झाला. पूजा वस्त्राकर आणि राधा यादव या जोडीने अर्ध्याहून अधिक संघाला बाद केलं. पूजाने 3.1 षटकात केवळ 13 धावा देत 4 बळी घेतले. राधाने 3 षटकांच्या गोलंदाजीत केवळ 6 धावा दिल्या आणि 3 बळी घेतले.

दरम्यान हा सामना जिंकून मालिका जिंकण्याकडे हरमनप्रीत कौरचे लक्ष असेल. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा 12 धावांनी पराभव केला होता. तर मालिकेतील दुसरा सामना अनिर्णित राहिला. दक्षिण आफ्रिका तिसरा टी-20 सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

SCROLL FOR NEXT