indian womens team twitter
क्रीडा

IND-W vs WI-W: टीम इंडियाची दमदार सुरुवात! सराव सामन्यात वेस्टइंडीजचा दारुण पराभव

Ankush Dhavre

भारतीय महिला संघ आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सराव सामन्यांचा थरार सुरू आहे. दरम्यान पहिल्या सराव सामन्यात भारतीय महिला संघाने वेस्टइंडीजला २० धावांनी धूळ चारली आहे. या सामन्यात फलंदाजी करताना जेमिमा रॉड्रिग्जने शानदार अर्धशतकी खेळी केली. तर पूजा वस्त्राकरने ३ गडी बाद केले.

या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर ८ गडी बाद १४१ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात भारतीय संघातील मुख्य फलंदाज शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना हे दोघेही फ्लॉप ठरले. शेफाली वर्मा ७, स्मृती मंधाना १४ तर हरमनप्रीत कौर केवळ १ धाव करत माघारी परतली.

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना जेमिमा रॉड्रिग्ज चमकली. तिने ५२ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. तर यस्तिका भाटियाने २४ धावांचे योगदान दिले. वेस्टइंडीजकडून गोलंदाजी करताना हेली मॅथ्यूजने १७ धावा खर्च करत ४ गडी बाद केले.

वेस्टइंडिजला जिंकण्यासाठी १४२ धावांची गरज

भारतीय संघाने वेस्टइंडीजला हा सामना जिंकण्यासाठी १४२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्टइंडीजलाही हवी तशी सुरुवात करता आली नाही. किआना जोसेफ १ तर हेली मॅथ्यूज शून्यावर माघारी परतली.

त्यानंतर शमेन कॅम्पबेलने २० धावांचे योगदान दिले. शिनेल हेनरीने नाबाद ५९ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र वेस्ट इंडीजला अवघ्या १२१ धावा करता आल्या. भारतीय पुरुष संघाने काही महिन्यांपूर्वीच टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आहे. आता भारतीय महिला संघानेही सराव सामन्यात बलाढ्य वेस्टइंडीजला पराभूत करत जेतेपदासाठी प्रबळद दावेदार असल्याचं दाखवून दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या पैशांवर भावाचा डल्ला, तब्बल ३८ अर्ज भरले; सरकारला घरबसल्या चुना

Maharashtra Cabinet Meeting: विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा धमाका, मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ३८ महत्वाचे निर्णय

Shukra Gochar: दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्र बदलणार रास; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार पैसा

Bigg Boss Marathi: अभिजीतच्या 'त्या' निर्णयावर जान्हवी संतापली, रडत रडत म्हणाली, या घरातली माझी किंमत...

Baby Care : नवजात बाळांचे केस विंचरताय? 'या' गोष्टींची घ्या काळजी

SCROLL FOR NEXT