Ind vs ZIM 1st T20I at Harare Today: झिम्बाब्वेविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. हरारेमध्ये सराव करताना भारतीय संघ आणि मुख्य प्रशिक्षक तसेच सपोर्ट स्टाफ BCCI /X
क्रीडा

Ind Vs Zim : भारत-झिम्बाब्वे सामना चुरशीचा होणार; पहिला टी २० सामना LIVE कुठे, कधी आणि कसा पाहाल?

Nandkumar Joshi

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज, शनिवार पहिला टी २० सामना हरारेच्या मैदानात होत आहे. हा सामना भारतातील चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क, सोनी लिव अॅपवर पाहता येणार आहे.

शुभमन गिल हा भारतीय संघाचा कर्णधार असेल. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ झिम्बाब्वेत पोहोचला आहे. अलीकडेच टी २० वर्ल्डकप स्पर्धा झाली आहे. त्या संघातील कोणताही खेळाडू झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. टी २० वर्ल्डकप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघातील तीन खेळाडूंना झिम्बाब्वे दौऱ्यात संधी मिळाली आहे. मात्र, मायदेशी परतण्यास विलंब झाल्याने यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे आणि संजू सॅमसन हे सुरुवातीच्या दोन सामन्यांत खेळू शकणार नाहीत. त्यांच्याऐवजी हर्षित राणा, साई सुदर्शन आणि जितेश शर्मा यांना स्थान देण्यात आलं आहे.

भारत - झिम्बाब्वे यांच्यातील पहिला टी २० सामना आज, शनिवारी म्हणजेच ६ जुलै रोजी खेळवला जाणार आहे.

हा सामना हरारे स्पोर्ट क्लबमध्ये खेळवला जाणार आहे.

India Vs Zimbabwe यांच्यातील पहिला टी २० सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता सुरू होईल. नाणेफेकीसाठी दोन्ही संघांचे कर्णधार अर्धा तास आधीच मैदानावर पोहोचतील.

भारतातील क्रिकेटप्रेमींना हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर बघायला मिळेल. तर ऑनलाइन सोनी लिव अॅपवर हा सामना पाहू शकता.

भारत - झिम्बाब्वे यांच्यातील T20 मालिकेचे वेळापत्रक पाहा

६ जुलै - पहिला टी २० सामना - हरारे स्पोर्ट्स क्लब, संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून.

७ जुलै - दुसरी टी २० लढत - हरारे स्पोर्ट्स क्लब, संध्याकाळी साडेचार वाजता सुरू होईल.

१० जुलैला तिसरा टी २० सामना होईल. हा सामना देखील हरारे स्पोर्ट्स क्लबवर रात्री साडेनऊ वाजता सुरू होईल.

१३ जुलै रोजी चौथी टी २० मॅच होईल. संध्याकाळी साडेचार वाजता हरारे स्पोर्ट्स क्लबवर हा सामना सुरू होईल.

शेवटचा आणि पाचवा टी २० सामना १४ जुलै रोजी होईल. हरारे स्पोर्ट्स क्लबवर संध्याकाळी साडेचार वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Screening Device : आता एका मिनिटात होणार कॅन्सरचं निदान, IIT कानपूरने बनवलं एक खास डिव्हाईस

Arbaz-Nikki : तुझं बाहेर लफडं असेल, अरबाजला भेटताच निक्की काय म्हणाली? VIDEO होतोय व्हायरल

Make Soap at Home : तांदळाच्या पिठापासून घरच्याघरी बनवा अंघोळीचा साबण; स्किन ग्लो करेल आणि चमकू लागेल

Marathi News Live Updates : रेल्वेच्या MPT मशीन एकमेकांना धडकल्या; चार कर्मचारी जखमी

Rock Salt Uses: उपवासाच्या दिवशी सैंधव मीठाचा वापर का केला जातो?

SCROLL FOR NEXT