indian cricket team twitter/bcci
Sports

IND vs ZIM, 4th T20I: रोहितच्या भिडूला गिल बसवणार? या गोलंदाजाला मिळू शकते संधी! पाहा प्लेइंग 11

Team India Playing 11 Prediction: भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रंगणार आहे.

Ankush Dhavre

भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत आतापर्यंत ३ सामने खेळले गेले आहेत. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक करत मालिका १-१ च्या बरोबरीत आणली.

त्यानंतर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे चौथा सामना जिंकून भारतीय संघ या मालिकेवर नाव कोरण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो.

आतापर्यंत भारतीय संघाने ३ सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळाले आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यातही भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. रियान परागला या मालिकेत हवी तितकी संधी मिळालेली नाही. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, त्याला चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं जाऊ शकतं.

त्याला संधी मिळाल्यास शिवम दुबेला विश्रांती दिली जाऊ शकते. यासह गोलंदाजीत एक मोठा बदल पाहायला मिळू शकतो. या सामन्यासाठी तुषार देशपांडेला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते. जर मुकेश कुमारला आणखी एका सामन्यात विश्रांती दिली गेली, तर खलील अहमद किंवा आवेश खानला विश्रांती देऊन तुषार देशपांडेला विश्रांती दिली जाऊ शकते.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड़, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT