झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ रणनीती ठरवताना.  BCCI / X
Sports

Ind vs Zim Playing XI : झिम्बाब्वेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग ११; शुभमन गिलनं ३ खेळाडूंची नावेही सांगितली

India vs Zimbabwe 1st T20 Playing 11 : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध पहिला टी २० सामना खेळणार आहे. टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११ कशी असेल?

Nandkumar Joshi

भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याला आज शनिवारपासून (६ जुलै) सुरुवात होत आहे. टी २० मालिकेचा पहिला सामना हरारे स्पोर्ट्स क्लबवर खेळवला जाणार आहे. भारताचा नवखा क्रिकेट संघ या दौऱ्यावर आहे. पहिल्या टी २० सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांसारखे अनुभवी खेळाडू संघात नाहीत. त्यांची उणीव भासणार आहेच, पण त्यांची जागा भरून कोण काढणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत जाणून घेऊयात.

टी २० वर्ल्डकप जिंकून भारतीय संघ मायदेशी परतला आहे. या संघातील तीन खेळाडूंना झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संधी देण्यात आली आहे. त्यात यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे आणि संजू सॅमसन असेल. मात्र, मायदेशी परतण्यास विलंब झाल्यानं सुरुवातीचे दोन सामने ते खेळू शकणार नाहीत.

शुभमन गिलकडे भारतीय क्रिकेट संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. आता शुभमन गिलसह कोणते ११ खेळाडू झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात मैदानात उतरणार आहेत, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. दुसरीकडे, गिलने संघातील ३ नावांवर शिक्कामोर्तब केलं आहे. गिलसोबत सलामीला अभिषेक शर्मा, तर क्रमांक ३ वर ऋतुराज गायकवाड फलंदाजीसाठी उतरणार आहे.

भारतीय टी २० क्रिकेट संघातील संभाव्य प्लेइंग ११ बाबत सांगायचे झाल्यास, शुभमन गिल, अभिषेक शर्मा हे दोघे सलामीला उतरतील आणि ऋतुराज गायकवाड क्रमांक ३ वर उतरणार आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला रियान पराग, पाचव्या क्रमांकावर ध्रुव जुरेल आणि क्रमांक सहावर रिंकू सिंह उतरण्याची शक्यता आहे.

वॉशिंग्टन सुंदर हा अष्टपैलू खेळाडू आहे. तर फिरकीपटूंमध्ये रवी बिश्नोईला संधी मिळू शकते. तर वेगवान गोलंदाज म्हणून खलील अहमद, आवेश खान आणि तुषार देशपांडेला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यातील संभाव्य प्लेइंग ११

शुभमन गिल हा कर्णधार असेल. अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, रवी बिश्नोई, खलील अहमद, तुषार देशपांडे.

झिम्बाब्वे दौऱ्यावरील भारतीय संघ

शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रियान पराग, ध्रुव जुरेल, रिंकू सिंह , वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद, रवी बिश्नोई, साई सुदर्शन, जितेश शर्मा, तुषार देशपांडे, हर्षित राणा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालवण येथे बेपत्ता मच्छीमाराचा मृतदेह 18 तासानंतर सापडला

शहापूरमध्ये शाळकरी मुलींना विवस्त्र करून मारहाण; पालकांचा एकच संताप, नेमकं काय घडलं? VIDEO

Cooking Tips : जेवणात जास्त गरम मसाला गेल्यास काय करावे?

बेळगावात मराठी कुटुंबानं उचललं टोकाचं पाऊल; विष प्राशन करून तिघांनी आयुष्य संपवलं, एकीची प्रकृती गंभीर | Belgaum

Ambernath : लिफ्टमध्ये एकटा दिसला, बिल्डिंगमधील व्यक्तीचा 12 वर्षीय मुलावर हल्ला; हातालाही चावला, अंबरनाथमध्ये खळबळ VIDEO

SCROLL FOR NEXT