india vs usa google
Sports

IND vs USA, Live Streaming: टीम इंडियासमोर अमेरिकेचं आव्हान! कुठे अन् किती वाजता रंगणार सामना?

India vs USA, Match Details: आज होणाऱ्या सामन्यात भारत आणि अमेरिका हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आज आणखी एक मोठा सामना पाहायला मिळणार आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि अमेरिका हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी २-२ सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज जिंकणाऱ्या संघाला सुपर ८ मध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. दरम्यान हा सामना कुठे पाहता येईल? जाणून घ्या.

भारत विरुद्ध अमेरिका सामना किती वाजता सुरू होणार आहे?

भारत विरुद्ध अमेरिका हा सामना १२ जून रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होईल. तर भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरू होईल.

भारत विरुद्ध अमेरिका सामना कुठे रंगणार आहे?

हा सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

भारत विरुद्ध अमेरिका सामना लाईव्ह कुठे पाहता येईल?

हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क किंवा डिस्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता. यासह तुम्ही लाईव्ह अपडेट्स www.esakal.saamtv.com वर देखील मिळवू शकता.

असे आहेत दोन्ही संघ :

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल.

असा आहे अमेरिकेचा संघ:

स्टीवन टेलर, मोणांक पटेल (कर्णधार, यष्टिरक्षक), अँड्रीस गौस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉस्टुश केंजीगे, सौरभ नेत्रवलकर, अली खान, निसर्ग पटेल, शायन जहांगीर, मिलिंद कुमार, शेडली वॅन शल्कविक.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tu Hi Re Maza Mitwa: 'मनात काही असेल...'; ईश्वरी अर्णवच्या प्रेमळ नात्याची सुरुवात, नव्या प्रोमोनं वेधलं लक्ष

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Bhagavad Gita: “कधी लढायचं आणि कधी मागे हटायचं?” भगवद्गीतेत दिलंय निर्णायक उत्तर

Siddharth-Mitali Lovestory: इन्स्टाग्रामवर चॅटिंग अन् नंतर केलं प्रपोज, कशी सुरू झाली सिद्धार्थ मितालीची लव्हस्टोरी

Neha Kakkar: नेहा कक्करचा एअरपोर्ट लूक पाहून नेटकरी थक्क; ट्रोलर्स म्हणाले, 'ही कसली फॅशन काहीही घालशील...'

SCROLL FOR NEXT