IND vs PAK Match: भारत- पाकिस्तान पुन्हा भिडणार? समोर आली मोठी अपडेट

Champions Trophy 2025: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
IND vs PAK Match: भारत- पाकिस्तान पुन्हा भिडणार? समोर आली मोठी अपडेट
india vs pakistansaam tv
Published On

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानच्या तोंडचा घास हिसकावत शानदार विजय मिळवला आहे. हा सामना न्यूयॉर्कच्या मैदानावर पार पडला. मात्र लवकरच हे दोन्ही संघ लाहोरमध्ये खेळताना दिसून येऊ शकतात. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील सामना होताच, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

क्रिकबझच्या वृत्नानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचं वेळापत्रक आयसीसीकडे सोपवलं आहे. या वेळापत्रकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख आणि सामन्याच्या ठिकाणाचाही उल्लेख करण्यात आला आहे. या स्पर्धेतील सामने शहरांमध्ये खेळले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यात लाहोर, रावलपिंडी आणि कराची या शहरांचा समावेश आहे. ही स्पर्धा १९ फेब्रुवारीला सुरु होणार असून ९ मार्च रोजी फायनलचा सामना खेळवला जाऊ शकतो.

IND vs PAK Match: भारत- पाकिस्तान पुन्हा भिडणार? समोर आली मोठी अपडेट
IND vs PAK: दारुण पराभवानंतर बाबर आझमला राग अनावर! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार, भारत- पाकिस्तान सामना लाहोरमध्ये होणार आहे. मात्र या सामन्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात यावंच लागेल, असं पाकिस्तानी दिग्गजांचं म्हणणं आहे. मात्र अजूनपर्यंत बीसीसीआयकडून कुठलीही अपडेट समोर आलेली नाही.

IND vs PAK Match: भारत- पाकिस्तान पुन्हा भिडणार? समोर आली मोठी अपडेट
IND vs PAK, T-20 World Cup: ६ चेंडू १८ धावा; अर्शदीपच्या शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

भारतीय संघाने ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला, तर ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जाऊ शकते. या स्पर्धेतील भारतीय संघाचे सामने यूएईमध्ये खेळवले जाऊ शकतात. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेपूर्वी झालेल्या आशिया चषक स्पर्धेचे यजमानपदही पाकिस्तानकडे होते. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यासाठी नकार दिल्याने, ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्यात आली होती. या स्पर्धेतील भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत खेळवले गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com