sri lanka saam tv
Sports

Sri Lanka Squad, IND vs SL: टीम इंडियाला आव्हान देण्यासाठी श्रीलंकेचा संघ जाहीर! या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

Sri Lanka Squad For Ind VS SL T20I Series: भारतीय संघाला आव्हान देण्यासाठी श्रीलंकेने आपल्या संघाची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २७ जुलै रोजी रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान भारतीय संघाला आवाहन देण्यासाठी श्रीलंकेने आपल्या १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

श्रीलंकेने कर्णधार बदलला

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान श्रीलंका संघाची जबाबदारी वनिंदू हसरंगाकडे होती. मात्र या स्पर्धेत सुपरफ्लॉप ठरल्यानंतर त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत चरिथ असलंका हा श्रीलंकेचा कर्णधार असणार आहे.

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये २७ जुलैपासून ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील सामने २७,२८ आणि ३० जुलै दरम्यान रंगणार आहे. या मालिकेसाठी वनिंदू हसरंगाचा श्रीलंकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र तो संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार नाही. या संघात दिनेश चंडीमललाही संघात स्थान दिलं गेलं आहे. यासह आयपीएल स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या महिष थिक्षाना आणि मथिशा पाथिरानाचा देखील या संघात समावेश करण्यात आला आहे.

टी-२० मालिकेसाठी असा आहे श्रीलंकेचा संघ:

चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल जे परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कमिंदु मेंडिस, दसुन शनाका, वनिंदू हसरंगा, महीश तीक्ष्णा, चामिंडु विक्रमसिंहे, नुवान तुषारा, दुनिथ वेलालगे, मथीश पथिराना, दुष्मंता चमीरा, बिनुरा फर्नांडो.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे,अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT