Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना नव्याने ई-केवायसी करावी लागणार? सरकारने दिली महत्वाची अपडेट

Ladki Bahin October-November Installment: लाडक्या बहिणींना सरकारने महत्वाचे आवाहन केले आहे. ई-केवायसीसंदर्भातील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका आणि बँकेची माहिती देऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना नव्याने ई-केवायसी करावी लागणार? सरकारने दिली महत्वाची अपडेट
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On: 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सध्या संभ्रमावस्थेत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या नवीन ई केवायसीबाबत सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट आणि मेसेज व्हायरल होत आहे. त्यामुळे आता पुन्हा ई-केवायसी करावी लागणार की काय? असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लाडक्या बहिणी चिंतेत आल्या आहेत. पण या पोस्टमागचे सत्य समोर आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट खोटी आहे. नवीन ई-केवायसीबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. याकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी लाभार्थी महिलांना केले आहे.

लाडकी बहीण योजनेची नवीन ई केवायसी प्रक्रिया सुरू झाल्याच्या खोट्या बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवर बनावट लिंक पाठवून वैयक्तिक माहिती भरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, शासन स्तरावर असा कोणताही निर्णय झालेला नसून या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी केले आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना नव्याने ई-केवायसी करावी लागणार? सरकारने दिली महत्वाची अपडेट
Ladki Bahin Yojana: नोव्हेंबरचे ३ आठवडे संपले, लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये कधी येणार?

व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामवरील अनोळखी लिंकवर क्लिक करून वैयक्तिक आणि बँकेशी संबंधित माहिती न भरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाचे लाभार्थी महिलांना केले आहे. पात्र महिलांना थेट लाभ हस्तांतरण द्वारे निधी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा बँक खात्याची माहिती भरून आर्थिक फसवणुकीला बळी पडू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना नव्याने ई-केवायसी करावी लागणार? सरकारने दिली महत्वाची अपडेट
Ladki Bahin Yojana : ८ दिवसांत नोव्हेंबर संपणार, लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा १५०० चा हप्ता कधी मिळणार?

दरम्यान, लाडक्या बहिणी सध्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या हप्त्याचे ३००० रुपये कधी मिळणार? याची वाट पाहत आहेत. नोव्हेंबर महिना संपत आला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. लाडकींना हे पैसे कधी दिले जाणार याबाबत देखील सरकारने अद्याप काहीच माहिती दिली नाही. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. लाभार्थींच्या बँक खात्यावर डीबीटी पद्धतीने पैसे जमा केले जातात.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना नव्याने ई-केवायसी करावी लागणार? सरकारने दिली महत्वाची अपडेट
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद होणार की सुरू राहणार? बावनकुळेंनी थेट सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.