लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचं लक्ष आता ऑक्टोबरच्या हप्त्याकडे लागलं आहे. सध्या नोव्हेंबर महिना सुरू असून २२ दिवस उलटून गेलेत, तरीही हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. ऐन लग्नसराईच्या काळात महिलांना आर्थिक मदतीची गरज असताना ऑक्टोबर-नोव्हेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता रखडलेला आहे. आता ऑक्टोबर-नोव्हेंबरचे एकूण ३००० रुपये एकत्र मिळणार का? असा प्रश्न लाडक्या बहिणींचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये उपस्थित झाला आहे.
राज्यातल्या काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांसाठी सरसकट ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या योजनांच्या निधीचं नियोजन सुरू असल्याची चर्चा आहे. याच कारणामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. पण, हप्ता उशिरा येण्यामागे हेच अधिकृत कारण असल्याचं सरकारने स्पष्ट केलेलं नाही.
सध्या लाडक्या बहिणींमध्ये सर्वात जास्त चर्चा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्याची सुरू आहे. जर २८ नोव्हेंबरपर्यंत ऑक्टोबरचा १५०० रुपयांचा हप्ता जमा झाला नाही, तर दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकत्र मिळणार का, असा प्रश्न महिलांना पडला आहे.
आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या निधीबद्दल काही निर्णय होतो का, याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे. पण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून ३००० रुपये एकत्र देण्याबाबत सरकारकडून अजून कोणताही अधिकृत आदेश किंवा घोषणा करण्यात आलेल्या नाहीत.
लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्याची स्थिती, आधार लिंकिंग आणि योजनेतल्या अर्जाचे स्टेटस तपासून घ्यावेत. तसेच अधिकृत घोषणा होईपर्यंत ३००० रुपये एकत्र मिळणार असल्याच्या चर्चेवर विश्वास ठेवू नये. आता सरकारकडून हप्त्याची तारीख कधी जाहीर होते आणि महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.