IND vs SL, 1st T20I: पंत की सॅमसन,रिंकू की शिवम? पहिल्या सामन्यात सूर्या या 11 खेळाडूंना देणार स्थान

Team India Playing XI: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पहिला टी-२० सामना २७ जुलै रोजी रंगणार आहे. या सामन्यासाठी कशी असेल प्लेइंग ११? जाणून घ्या.
team india
team indiasaam tv
Published On

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघामध्ये टी -२० मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघ ३ वनडे आणि ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. या मालिकेची सुरुवात २७ जुलैला होणाऱ्या पहिल्या टी -२० सामन्याने होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. दरम्यान पहिल्या टी -२० सामन्यासाठी कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळणार? जाणून घ्या.

team india
IND vs SL: या 3 खेळाडूंना भारत- श्रीलंका मालिकेत संधी मिळणं कठीण! संपूर्ण मालिकेत बाकावर बसावं लागणार

या मालिकेतून गौतम गंभीर पहिल्यांदाच मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सूर्यकुमार यादव पूर्णवेळ टी -२० कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघेही आपल्या अभियानाची सुरुवात विजयाने करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. दरम्यान १५ खेळाडूंमधून ११ खेळाडूंची निवड करणं हे दोघांसमोर असलेलं मोठं आव्हान आहे.

सलामीला कोण येणार?

गेल्या काही महिन्यांपासून यशस्वी जयस्वाल हा भारतीय संघासाठी सलामीवीर फलंदाजाची भूमिका पार पाडतोय. त्याने सलामीला फलंदाजी करताना धावांचा पाऊसही पाडला आहे. त्यामुळे तो सलामीला येणार हे निश्चित आहे. तर त्याला साथ देण्यासाठी शुभमन गिल मैदानावर येऊ शकतो. दोघेही आक्रमक फलंदाज आहेत. त्यामुळे दोघेही संघाला आक्रमक सुरुवात करून देऊ शकतात.

team india
Team India News: या 5 खेळाडूंची वनडे कारकिर्द जवळजवळ संपली! निवृत्तीशिवाय पर्याय नाही

टी -२० वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान रिषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत होता. त्यामुळे यावेळीही तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. त्यानंतर हार्दिक पंड्या, रिंकू सिंग आणि अक्षर पटेल हे फलंदाज मोठे फटके खेळताना दिसतील.

या गोलंदाजांना मिळू शकते संधी

या सामन्यासाठी रवि बिश्नोईचा संघात समावेश केला जाऊ शकतो. यासह त्याला मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग या वेगवान गोलंदाजांची जोड मिळेल.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११: (Team India Playing XI)

शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com