Khaja Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली? घरच्या घरी बनवा हेल्दी आणि खुसखुशीत खाजा, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

खाजा बनवण्यासाठी साहित्य

खाजा तयार करण्यासाठी २ वाट्या मैदा, ४ चमचे तूप, चिमूटभर मीठ, पाणी, तळण्यासाठी तेल आणि साखरेचा पाक बनवण्यासाठी १ वाटी साखर व अर्धी वाटी पाणी घ्या. तसेच वेलची पूडही घ्या.

Khaja Recipe | Saam Tv

मैदा मळून घ्या

सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात मैदा, तूप आणि मीठ घालून चांगले एकत्र करा. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या. हे पीठ १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा.

Khaja Recipe | Saam Tv

पिठाच्या पातळ पोळ्या लाटा

आता मळलेल्या पिठाचे समान आकाराचे गोळे तयार करा. प्रत्येक गोळ्याची पातळ पोळी लाटून घ्या. पोळ्यांवर थोडे तूप आणि मैदा लावून एकावर एक ठेवा. यामुळे खाजा कुरकुरीत आणि पदरदार होण्यास मदत होते.

Khaja Recipe | Saam Tv

खाज्याला योग्य आकार द्या

एकावर एक ठेवलेल्या पोळ्या हलक्या हाताने गुंडाळा किंवा घडी घाला. त्यानंतर सुरीने समान आकाराचे तुकडे कापून घ्या. प्रत्येक तुकड्याला हलके दाबून खाज्याचा आकार द्या.

Khaja Recipe

मंद आचेवर खाजा तळून घ्या

कढईत तेल गरम करा. तेल जास्त गरम नसताना खाज्याचे तुकडे त्यात सोडा. मंद ते मध्यम आचेवर खाजा सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर अतिरिक्त तेल निघण्यासाठी ताटात काढा.

Khaja Recipe

साखरेचा पाक तयार करा

एका भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून गरम करा. साखर पूर्ण विरघळल्यानंतर त्यात वेलची पूड घाला. पाक थोडा चिकट होईपर्यंत शिजवा. खाजा पाकात घालताना पाक कोमट असणे योग्य ठरते.

Khaja Recipe

खाज्याला पाक लावून सर्व्ह करा

तळलेले खाज्याचे तुकडे कोमट पाकात घाला. काही मिनिटे पाकात मुरू द्या आणि नंतर बाहेर काढून ताटात ठेवा. पाक सुकल्यानंतर खाजा खाण्यासाठी तयार होईल. चहा किंवा सणासुदीच्या फराळासोबत हा गोड पदार्थ सर्व्ह करा.

Khaja Recipe | Saam Tv

Kanjivaram Silk Saree Designs: पारंपरिक लुकला द्या रॉयल टच! कांजीवरम सिल्क साडीचे ७ सुंदर ट्रेंडिंग डिझाईन्स

Kanjivaram Silk Saree Designs
येथे क्लिक करा