ind vs sa google
क्रीडा

IND vs SA, Test Series: वनडे तर जिकंले,कसोटी मालिका जिंकणं कठीण! हा रेकॉर्ड वाढवतोय टीम इंडियाची चिंता

Ankush Dhavre

Ind vs Sa, Head To Head Record:

वनडे आणि टी-२० मालिकेत दमदार खेळ केल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

या मालिकेत विराट, रोहित आणि बुमराहसारखे प्रमुख खेळाडू संघात कमबॅक करताना दिसून येणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेला कसोटीमध्ये पराभूत करणं मुळीच सोपं नाही.

वनडे आणि टी-२० मालिकेत दमदार खेळ केल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत विराट, रोहित आणि बुमराहसारखे प्रमुख खेळाडू संघात कमबॅक करताना दिसून येणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेला कसोटीमध्ये पराभूत करणं मुळीच सोपं नाही.

नुकताच दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा २-१ ने धुव्वा उडवला. कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबर रोजी सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट्स पार्कच्या मैदानावर खेळला जाईल.

ही मालिका भारतीय खेळाडूंसाठी कमबॅक मालिका असणार आहे. वनडे आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आलेले विराट कोहली, रोहित शर्मा, आर अश्विन आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेत कमबॅक करताना दिसतील. (Latest sports updates)

कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, दोन्ही संघ ४२ वेळेस आमने सामने आले आहेत. या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड राहिलं आहे.

भारतीय संघाला १५ सामने जिंकता आले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने १७ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. यादरम्यान १० कसोटी सामने ड्रॉ राहिले आहेत. मुख्य बाब म्हणजे भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत जाऊन दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेत पराभूत करु शकलेला नाही.

गेल्या ३१ वर्षांपासून भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेला हरवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र आजवर कसोटी मालिकेत हरवू शकलेला नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ १९९२-९३ मध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका खेळण्यासाठी आमने सामने आले होते.

या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-० ने मालिका जिंकली होती. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला ही मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा डाव; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT