india vs south africa twitter
Sports

IND vs SA, Final: भारत- दक्षिण आफ्रिका सामन्यावर पावसाचं सावट! फायनल रद्द झाल्यास कोण होणार चॅम्पियन?

India vs South Africa, T20 WC Final Weather Update: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना रंगणार आहे.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील दुसऱ्या सेमिफायनलचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला धुळ चारत तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

हा सामना स्थानिक वेळेनुसार, सकाळी १० वाजता सुरु होईल. तर भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरु होईल. दरम्यान या महत्वाच्या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. २९ जून रोजी बाराबाडोसमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास कसा लावला जाईल विजेत्या संघाचा निकाल? जाणून घ्या.

कसं असेल हवामान?

accuweather ने दिलेल्या सामन्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता ही ७८ टक्के इतकी असणार आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरु होईल. मात्र टेन्शन वाढवणारी बाब अशी की, रात्री ३ वाजता पाऊस पडण्याची शक्यता ही ५० टक्के इतकी असणार आहे. तर सकाळी ११ वाजता पाऊस पडण्याची शक्यता ही ६० टक्के इतकी असणार आहे. त्यानंतर १२ ते ३ दरम्यानही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मैदान कोरडं असेल, तरच हा सामना पूर्ण होईल.

या सामन्यासाठी राखीव दिवस आहे का?

या स्पर्धेतील पहिल्या सेमिफायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. तर दुसऱ्या सेमिफायनलसाठी राखीव दिवस तर नव्हता, माज्ञ अतिरीक्त तास दिले गेले होते. क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बाब अशी की, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या फायनलच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे हा सामना २९ ला पूर्ण होऊ शकला नाही, तर ३० जून रोजी हा सामना खेळवण्यात येईल.

राखीव दिवशी पाऊस आला तर काय?

राखीव दिवशीही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी जर पावसाने हजेरी लावली, तर दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेता घोषित करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील 'या' धबधब्यावर शाहरुख खानने केली धमाल, तुम्ही कधी गेलात का?

Shocking: अपहरण करून शेतात फरपटत नेलं, अत्याचारानंतर मुलीला तडफडवलं; ८ वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या

माझी बायको घर सोडून गेली, मी जिवंत राहणार नाही; पाण्याच्या टाकीवर चढून नवऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Instagram : Instagram वर पॉपुलर होण्यासाठी फॉलो करा या 7 सुपरहिट स्टेप

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये 'तारक मेहता का उलटा चश्मा'मधील 'या' सदस्याची एन्ट्री, कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT