नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंडमधील सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदा फायनलला पोहोचलेल्या दक्षिण अफ्रिकेशी भारताचा सामना होणार आहे. या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्ताचा माजी खेळाडू शोएब अख्तरने मोठी भविष्यवाणी केली आहे.
शोएब अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हटलं की, 'मला वाटतं की, भारतच हा सामना जिंकू शकतो. यासाठी भारताला शुभेच्छा. मी मागील अनेक दिवसांपासून सांगत आहे की, मागील विश्वचषक त्यांनी जिंकले पाहिजे होते. यंदाही होणारा विश्वचषक भारताने जिंकला पाहिजे.
'दक्षिण अफ्रिकाने नाणेफेक जिंकल्यास त्यांनी प्रथम फलंदाजी करायला हवी. मात्र, भारताच्या फिरकीपटूंसमोर कोण धावा काढणार? टीम इंडियाने हा सामना जिंकायला हवा, अशीही इच्छा शोएबने व्यक्त केली.
विश्वचषकाच्या फायनल सामन्यापूर्वी शोएब अख्तरने मोठं भाष्य केलं. फायनल सामन्याविषयी बोलताना शोएब म्हणाला, 'मला वाटतं की, ऋषभ पंत आणि रोहित शर्मा या दोघांनी सुरुवातीला फलंदाजीसाठी उतरलं पाहिजे. तर विराटने तिसऱ्या क्रमांकावर खेळलं पाहिजे. विराट कोहलीने त्याच्या फॉर्ममध्ये खेळायला सुरुवात केल्यास टीम इंडियाचं टेन्शन मिटेल'.
दरम्यान, भारत आणि दक्षिण अफ्रिकेमध्ये आज शनिवारी अंतिम सामना होणार आहे. दोन्ही संघ सर्व सामने जिंकून अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले आहेत. भारत अंतिम सामना जिंकल्यास दुसऱ्यांदा विश्वचषकाचा विजेता ठरेल. तर दक्षिण अफ्रिका जिंकल्यास त्यांचा संघ पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरेल.
फायनल सामना २९ जून रोजी होऊ शकला नाही, तर दुसरा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे ३० जूनलाही पावसाचा अंदाज आहे. ३० जूनलाही पाऊस कोसळल्यास सामना रद्द करण्यात येईल. त्यानंतर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.