भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये नुकताच ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. ही मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ वनडे आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.
कसोटी मालिकेपू्र्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मोहम्मद शमी या मालिकेत खेळताना दिसून येणार नाहीये.
मोहम्मद शमी दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळताना दिसून येणार नाहीये. मेडीकल टीमने त्याला न खेळण्याचा सल्ला दिला आहे. शमीसह वेगवान गोलंदाज दीपक चाहरने देखील वनडे मालिकेतून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे.बीसीसीआयने म्हटलं आहे की, 'कुटुंबातील वैद्यकिय आणीबाणीमुळे दीपक चाहर आगामी वनडे मालिकेत खेळताना दिसून येणार नाही. त्याच्याऐवजी आकाशदीपला संघात स्थान दिलं गेलं आहे.
श्रेयस अय्यर २ वनडे सामन्यातून बाहेर..
भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मध्यक्रमातील प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर या मालिकेतील २ सामन्यांमध्ये खेळताना दिसून येणार नाही. त्यानंतर तो कसोटी संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. (Latest sports updates)
भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेचा थरार..
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडलेली टी-२० मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली.आता हे दोन्ही संघ वनडे मालिका खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना १७ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना जोहान्सबर्गमध्ये खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना १९ डिसेंबर रोजी पोर्ट एलिजाबेथ आणि तिसरा वनडे सामना २१ डिसेंबर रोजी पार्लमध्ये खेळला जाणार आहे.
भारत- दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
ऋतुराज गायकवाड़, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार) (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, आकाश दीप
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.