Suryakumar Yadav Instagram Story: रोहितला कॅप्टनसीवरुन काढताच सूर्याच्या पहिल्या पोस्टने चर्चेला उधाण

Suryakumar Yadav News: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या सूर्यकुमार यादवने एक लक्षवेधी स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीवरुन क्रिकेट चाहते आता तर्क वितर्क लावताना दिसून येत आहेत.
mumbai indians
mumbai indianssaam tv news
Published On

Suryakumar Yadav Instagram Story:

रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून टाकल्यानंतर मुंबईचे फॅन्स नाराजी व्यक्त करताना दिसून आले आहेत. काहींनी कॅप जाळली तर काहींनी मुंबईची जर्सी जाळून या निर्णयाचा विरोध केला आहे. दरम्यान हे प्रकरण सुरु असताना दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या सूर्यकुमार यादवने एक लक्षवेधी स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीवरुन क्रिकेट चाहते आता तर्क वितर्क लावताना दिसून येत आहेत. (Suryakumar Yadav)

भारताचा आणि मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने हार्टब्रेकचा इमोजी शेअर केला आहे.

या स्टोरीवर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. काहींचं म्हणणं आहे की, रोहितला कर्णधारपदावरुन काढल्यानंतर सूर्यकुमार यादव नाराज झाला आहे.त्यामुळे त्याने ही इमोजी शेअर केली आहे. तर काहींचं म्हणणं आहे की, रोहितला कर्णधार पदावरुन काढून टाकल्यानंतर सूर्याला कर्णधारपद हवं होतं. मात्र असं झालं नाही. त्यामुळे तो नाराज झाला आणि त्याने ही स्टोरी शेअर केली. (Latest sports updates)

mumbai indians
Hardik Pandya MI Captain: रोहितला काढून हार्दिकला कॅप्टन बनवण्यामागे काय आहे मुंबईचा मास्टरप्लान?

सूर्याने ही स्टोरी का शेअर केली आणि ही स्टोरी शेअर करण्यामागचं नेमकं कारण काय? याचं उत्तर आता स्वत: सूर्याच देऊ शकतो. शुक्रवारी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेत चाहत्यांना धक्का दिला आहे.

आगामी आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहितला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवली आहे. सूर्यकुमार यादव भारतीय टी-२० संघाचं नेतृत्व करतोय त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात होता की, रोहितनंतर सूर्यकुमार यादवला नेतृत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

कर्णधार म्हणून कसा राहिलाय रोहित शर्माचा रेकॉर्ड?

आयपीएल २०१३ स्पर्धेत रिकी पाँटिंगने कर्णधार पदावरून माघार घेतल्यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. रोहित शर्माला मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून १५८ सामने खेळण्याची संधी मिळाली.

mumbai indians
IND vs SA,3rd T20I: सूर्याच्या दुखापतीने वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन! सामन्यानंतर समोर आली मोठी अपडेट

यादरम्यान ८६ सामने हे मुंबई इंडियन्सने जिंकले. तर ६८ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर ४ सामने बरोबरीत समाप्त झाले आहेत. रोहितने मुंबईला ५ वेळेस (२०१३,२०१५,२०१७,२०१९,२०२०)आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com