क्रिकेटमध्ये तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, एखादा सामना पावसामुळे किंवा वादळ आल्यामुळे थांबवला जातो. मात्र भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना आगळ्या वेगळ्या कारणामुळे थांबवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असतानाच मैदानात किड्यांनी हल्ला केला. त्यामुळे फलंदाजांना लक्ष केंद्रित करणं कठीण होत होतं. शेवटी अंपायरने खेळाडूंना बाहेर जाण्यास सांगितलं.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पहिलाच षटकात मोठा धक्का बसला. संजू सॅमसन शून्यावर माघारी परतला. त्यानंतर तिलक वर्मा आणि अभिषेक शर्माने मिळून डाव सावरला. दोघांनी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव १०० पार नेला. भारतीय संघाने २० षटक अखेर २१९ धावांपर्यंत मजल मारली.
दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी २२० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेची सलामी जोडी मैदानावर आली. अर्शदीप सिंगने भारताकडून पहिले षटक टाकले. त्यानंतर दुसरे षटक सुरू होणार, इतक्यात मैदानात किड्यांची फौज आली. त्यामुळे हा सामना थांबवण्यात आला. १५ मिनिटे हा सामना थांबूनच होता.
तिलक वर्माच्या शतकी खेळीच्या आणि अभिषेक शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने २० षटक अखेर २१९ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी २२० धावा करायच्या होत्या.
आफ्रिकेकडून मार्को यानसेनने ५१ आणि हेनरिक क्लासेनने ४१ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र दक्षिण आफ्रिकेला २०८ धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना भारतीय संघाने ११ धावांनी जिंकून मालिकेत २-१ ने आघाडी घेतली
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.