IND vs SA 3rd T20I: भारताने सलग तिसऱ्यांदा टॉस गमावला! प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करत फलंदाजीला उतरणार

IND vs SA 3rd T20I, Playing XI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने टॉस गमावला आहे.
IND vs SA 3rd T20I: भारताने सलग तिसऱ्यांदा टॉस गमावला! प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करत फलंदाजीला उतरणार
ind vs satwitter
Published On

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ४ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील तिसरा सामना सुपरस्पोर्ट्स पार्कच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण आफ्रिकेने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान या सामन्यासाठी दोन्ही संघांमध्ये १-१ बदल करण्यात आला आहे.

भारतीय संघात बदल

या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे.

भारतीय संघाला ही मालिका जिंकायची असेल, तर हा सामना जिंकावाच लागेल. या सामन्यासाठी भारतीय संघात १ बदल करण्यात आला आहे. आवेश खानला विश्रांती देऊन रमनदीप सिंगला पदार्पण करण्याची संधी दिली गेली आहे. त्यामुळे भारतीय संघाला एल फलंदाज आणि गोलंदाज मिळाला आहे.

IND vs SA 3rd T20I: भारताने सलग तिसऱ्यांदा टॉस गमावला! प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करत फलंदाजीला उतरणार
IND vs SA, Weather Update: मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे धुतला जाणार? वाचा कसं असेल हवामान

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत (प्लेइंग XI):

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, अर्जुनदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती

IND vs SA 3rd T20I: भारताने सलग तिसऱ्यांदा टॉस गमावला! प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करत फलंदाजीला उतरणार
IND vs AUS: खरंच ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात 4-1 ने हरवणं शक्य आहे का? BGT मध्ये कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

दक्षिण अफ्रिका (प्लेइंग XI):

रायन रिकलटन, रीजा हेंड्रिक्स, एईडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, मार्को जानसेन, अँडिले सिमलाने, जेरेल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुथो सिपामला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com