india vs south africa X/BCCI
Sports

IND vs SA, Playing 11: द. आफ्रिकेचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय! टीम इंडियात २ मोठे बदल

India vs South Africa 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या मैदानावर सुरु आहे.

Ankush Dhavre

India vs South Africa 2nd Test Playing 11:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या मैदानावर सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका बरोबरी आणण्यासाठी हा सामना जिंकणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.या सामन्यात टेम्बा बावूमाच्या अनुपस्थितीत डीन एल्गर संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. गेल्या सामन्यात दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला रविंद्र जडेजा या सामन्यात कमबॅक करताना दिसून येणार आहे. या संघातून आर अश्विनला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. तर शार्दुल ठाकुरला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी मुकेश कुमारला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं आहे. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका संघ: डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्क्रम, टोनी दे झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंघम, कायल वेररेने (यष्टीरक्षक), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT