IND vs PAK Asia Cup 2023 Twitter
Sports

IND vs PAK Asia Cup 2023: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात इशान-हार्दिकनंतर पावसाची 'बॅटिंग'; हायव्होल्टेज सामना रद्द

IND vs PAK Asia Cup 2023: आशिया कप स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

IND vs PAK Asia Cup 2023:

आशिया कप स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना अनिर्णित राहिला आहे. (Latest Marathi News)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा, विराट कोहली, अय्यर आणि शुभमन गिल हे एकापाठोपाठ बाद झाले. भारताच्या टॉप ऑर्डरने पाकिस्तानी गोलंदाजांसमोर अक्षरशः लोटांगण घातलं.

टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर मैदानात उतरलेल्या हार्दिक पंड्या आणि इशान-किशानने संघाची कमान सांभाळली. दोघांनी विक्रमी भागिदारी रचली. इशान आणि हार्दिकने राहुल द्रविड आणि युवराज सिंहचा विक्रम मोडीत काढला.

हार्दिक आणि इशानने तुफान फलंदाजी केली. इशानने ८२ धावा कुटल्या तर तर हार्दिक पंड्याने ८७ धावा कुटल्या. टीम इंडियाने ४८.५ षटकांत २६६ धावा कुटल्या. पाकिस्तानला जिंकण्यासाठी २६७ धावा हव्या होत्या.

मात्र, पावसामुळे हा सामना थांबविण्यात आला होता. पाऊस जाण्याची बराच वेळ वाट पाहिली. मात्र, पावसाची रिमझिम थांबली नाही. अखेर पंचांनी दोन्ही कर्णधारांशी बोलून झाल्याचे घोषित केले.

मैदान कोरडे करण्याचं काम सुरू होतं, पण...

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यानच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना थांबविण्यात आला. पाऊस आल्याने सामन्याचे दुसऱ्या डावाचे षटक कमी करण्यात आले होते.

पावसामुळे DLS समीकरणानुसार २० षटकांचा सामना सुरु करण्याची शक्यता होती. मात्र, पाऊस सुरूच राहिल्याने सामना रद्द करण्याची घोषणा करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT