टीम इंडियाला एकापाठोपाठ एक धक्के मिळू लागले आहेत. भारताचा नववा गडी तंबूत परतला आहे.
टीम इंडियाची पडझड सुरूच आहे. रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर शार्दुल ठाकूर बाद झाला आहे.
हार्दिक पंड्या ८७ धावांवर बाद झाला, यामुळे १३ धावांनी त्याचं शतक हुकलं.
ईशानपाठोपाठ हार्दिक पंड्याने अर्धशतक ठोकलं आहे.
ईशान किशन आणि हार्दिकच्या भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने ३० व्या षटकात १५० धावा पूर्ण केल्या आहेत.
ईशानने ५४ चेंडूंचा सामना करत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे
शुबमन गिल अवघ्या १० धावा करत माघारी परतला आहे.
ईशान कि्शन ८ धावांवर फलंदाजी करतोय. तर शुबमन गिल ७ धावांवर नाबाद आहे
विराट कोहली अवघ्या ४ धावा करत माघारी परतला आहे.
रोहित शर्मा ११ धावा करत माघारी परतला आहे .
पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला होता. मात्र पाऊस थांबला असून सामना लवकरच सुरु होईल.
रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे दोघेही सलामीवीर खेळत आहेत. रोहित शर्मा ११ धावांवर नाबाद आहे. तर गिलला अजूनही खाते उघडता आले नाही.
या सामन्यासाठी मोहम्मद शमीला बाहेर ठेवण्यात आलं आहे. तर शार्दुल ठाकुरचा या सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
आशिया चषक २०२३ स्पर्धेतील तिसरा सामना रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. गेल्या वेळी हे दोन्ही संघ २०१९ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आमने सामने आले होते.
या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती. तसेच या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर,पाकिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात नेपाळवर २३८ धावांनी विजय मिळवला होता. तर भारतीय संघाचा हा पहिला सामना आहे. (India vs Pakistan Live Score Updates)
अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.