ind vs pak  saam tv news
Sports

IND vs PAK Match Tickets: भारत- पाकिस्तान टी-२० सामन्याच्या तिकीटांच्या विक्रीला सुरुवात; किंंमत ऐकून झोपच उडेल

ICC T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळू शकतात .

Ankush Dhavre

India vs Pakistan T20 World Cup Match Tickets Rates:

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळू शकतात .दरम्यान या स्पर्धेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आयसीसीने या स्पर्धेतील सामन्यांच्या तिकीटांची विक्री सुरु केली आहे. दरम्यान भारत-पाकिस्तान यांच्याक होणाऱ्या सामन्याच्या तिकीटाची रक्कम समोर आली आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला १ जूनपासून प्रारंभ होणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना २९ जून रोजी खेळला जाणार आहे. आयसीसीकडून सुपर ८ आणि सेमीफायनलच्या सामन्यांची २.६० लाख तिकीटं विक्रीसाठी काढण्यात आली आहेत.

या स्पर्धेसाठीचं सर्वात स्वस्त तिकीट ६ डॉलर म्हणजेच ५०० रुपयांचं असणार आहे. तर सर्वात महाग तिकीट २५ डॉलर म्हणजेच २०७१ रुपये इतकं असणार आहे. हे तिकीट तुम्ही t20worldcup.com या सांकेतिक स्थळावर जाऊन बुक करु शकता. आयसीसीच्या सांकेतिक स्थळावरुन एक व्यक्ती जास्तीत जास्त ६ तिकीट बुक करु शकतो. (Cricket news in marathi)

भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीटांची किंमत किती?

भारत आणि पाकिस्तान हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट फॅन्सला मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. प्रीमियम कॅटेगरीच्या तिकीटांची किंमत १७५ डॉलर म्हणजेच १४४५० रुपये इतकी असणार आहे. तर स्टँडर्ड प्लस कॅटेगरीच्या तिकीटांची किंमत २५००० रुपये इतकी असणार आहे. तर या सामन्याचं सर्वात महागडं तिकीट ३३००० रुपयांचं असणार आहे.

केव्हा रंगणार भारत-पाकिस्तान सामना?

भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. भारतीय संघाचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात भारतीय संघासह पाकिस्तान, अमेरिका,कॅनडा आणि आयर्लंड या संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ९ जून रोजी आमने सामने येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT