IND vs PAK Asia Cup 2023 Saam tv
Sports

IND vs PAK Asia Cup 2023: ईशान किशन-हार्दिक पंड्यानं सावरलं, नंतर बुमराहने ठोकून काढलं; टीम इंडियाचं पाकिस्तानला २६७ धावांचं लक्ष्य

IND vs PAK Asia Cup 2023: ईशान किशन आणि हार्दिक पंड्याने चांगली खेळी खेळली. टीम इंडियाने पाकिस्तानला २६७ धावांचं आव्हान दिलं आहे

Vishal Gangurde

IND vs PAK Asia Cup 2023

आशिया कप स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तानचा हायव्होल्टेज सामना श्रीलंकेत सुरू आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची फलंदाजीची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ईशान किशन आणि हार्दिक पंड्याने चांगली खेळी खेळली. टीम इंडियाने पाकिस्तानला २६७ धावांचं आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियाला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला. शाहीन आफ्रिदीने रोहितला त्रिफळाचित केले. रोहितने ११ चेंडूत २२ धावा केल्या. (Cricket Latest News)

रोहितनंतर विराट मैदानात उतरला. विराटही अधिक वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. विराटने सात चेंडूत चार धावा कुटल्या. पाच महिन्यानंतर मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यरही फारसं चांगलं प्रदर्शन करू शकला नाही. श्रेयसने ९ चेंडूत १४ धावा कुटल्या. शुभमन गिलदेखील चमकदार कामगिरी करु शकला नाही. शुभमनही १० धावांवर तंबूत परतला.

शुभमन बाद झाल्यानंतर ईशान किशन आणि हार्दिक पंड्या मैदानात उतरले. ईशान-हार्दिकने संघाची कमान सांभाळली. दोघांनी १४१ चेंडूत १३८ धावांची भागिदारी रचली. यामुळे भारताची धावसंख्या अडीचशे पार झाली.

ईशान किशान ८१ धावांवर बाद झाला. तर हार्दिक पंड्या ८७ धावांवर बाद झाला. टीम इंडियाने पाकिस्तानला २६७ धावांचं आव्हान दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT