IND VS PAK, Asia Cup 2023: तू चल , मैं आया..! रोहित, विराट, अय्यर अन् गिल.. टीम इंडियाच्या धुरंधरांचे पाकिस्तानसमोर अक्षरशः लोटांगण

Team India's Top Order Collapsed: भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरला या सामन्यात हवी तशी कामगिरी करता आली नाही
team india
team indiasaam tv
Published On

India vs Pakistan News In Marathi:

आशिया चषक २०२३ स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

नाणेफेकीचा निर्णय भारतीय संघाच्या बाजूने राहिला. मात्र भारतीय संघाचा हा निर्णय फसला. कारण भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरला हवी तशी सुरूवात करून देता आला नाही.

team india
IND vs PAK Record: टीम इंडियाला हरवणं सोपं नाही; गेल्या ५ सामन्यांमध्ये पाकविरूद्ध असा राहिलाय रेकॉर्ड

भारतीय टॉप ऑर्डरचा फ्लॉप शो..

भारत पाकिस्तान सामन्यात खेळाडूंवर दबाव असतो. हाच दबाव या सामन्यातही दिसून आला. याचा फायदा पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी घेतला. पावसामुळे खेळ थांबण्याचे सत्र सुरू होते.

दरम्यान पाऊस थांबल्यानंतर जेव्हा खेळ पुन्हा सुरू झाला त्यावेळी सुरूवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला.

तर झाले असे की, शाहिन आफ्रिदी पाकिस्तानकडून पाचवे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता.या षटकातील शेवटचा चेंडू टप्पा पडून आत आला आणि काही कळायच्या आत रोहितची दांडी उडवून गेला. (Latest sports updates)

team india
Shaheen Shah Afridi Bowling: भारताचे शेर आफ्रिदीसमोर ढेर! शाहिनने विराट अन् रोहितची केली दांडी गुल; पाहा VIDEO

विराट,श्रेयस स्वस्तात माघारी...

रोहित शर्मा गेल्यानंतर विराट कोहली फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. विराट कोहली हा पाकिस्तान संघाविरूद्ध नेहमीच चांगली कामगिरी करतो.

यावेळी देखील त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र या सामन्यात तो सेट होणार इतक्यात शाहिन शाह आफ्रिदीने त्याला ४ धावांवर बाद करत माघारी धाडले.

गेले काही महिने दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या श्रेयस अय्यरला या सामन्यातून पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र तो या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकला नाही. तो अवघ्या १४ धावा करून झेलबाद होऊन माघारी परतला.

अय्यर पाठोपाठ चांगल्या फॉर्ममध्ये असलेला शुबमन गिल देखील अवघ्या १० धावा करत माघारी परतला.

भारतीय टॉप ऑर्डरच्या फलंदाजांकडून तू चल , मैं आया..! असंच काहितरी चित्र पाहायला मिळालं. पाकिस्तानला शाहिन आफ्रिदी आणि हारिस रउफने चांगली सुरूवात करून दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com