arshdeep singh twitter
क्रीडा

IND vs PAK, T-20 World Cup: ६ चेंडू १८ धावा; अर्शदीपच्या शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

Ankush Dhavre

भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानचा ६ धावांनी धुव्वा उडवला आहे. या सामन्यात पाकिस्तानला एकतर्फी विजय मिळवण्याची संधी होती. मात्र भारतीय गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा डाव ढेपाळला. या सामन्यात भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले. मात्र गोलंदाजांनी जागा भरून काढली. शेवटच्या षटकात विजयासाठी १८ धावांची गरज होती. तेव्हा काय घडलं? जाणून घ्या.

या सामन्यात १२० धावांचा पाठलाग करत असलेल्या पाकिस्तानला शेवटच्या षटकात १८ धावा करायच्या होत्या. त्यावेळी अर्शदीप सिंग गोलंदाजी करण्यासाठी आला. त्यावेळी पाकिस्तानकडून इमाद वसीम आणि नसीम शाह स्ट्राइकवर होते. मात्र अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी केली आणि पाकिस्तानला शेवटच्या षटकात अवघ्या ११ धावा करू दिल्या.

शेवटच्या षटकात काय घडलं?

पहिला चेंडू - अर्शदीप सिंगच्या पहिल्याच चेंडूवर इमाद वसीम बाद होऊन माघारी परतला.

दुसरा चेंडू - दुसऱ्या चेंडूवर नसीम शाहने एक धाव घेतली

तिसरा चेंडू - शाहीन शाह आफ्रिदीने १ धाव घेतली

चौथा चेंडू - नसीम शाहने थर्ड मॅनच्या दिशेने चौकार मारला

पाचवा चेंडू - नसीम शाहने पॉइंटच्या दिशेने चौकार मारला.

सहावा चेंडू - शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला ८ धावांची गरज होती. नसीम शाहने १ धाव घेतली आणि भारतीय संघाने हा सामना ६ धावांनी आपल्या नावावर केला.

भारतीय गोलंदाजांची चमकदार कामगिरी

छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्याचा हिरो ठरला. त्याने ४ षटकात अवघ्या १४ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तर हार्दिक पंड्याने २ गडी बाद केले आणि अर्शदीप सिंगने १ गडी बाद केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT