IND vs NZ Weather Report Saam tv news
Sports

IND vs NZ Weather Report: भारत- न्यूझीलंड लढतीत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज! सामना रद्द झाल्यास काय?

India vs New Zealand Weather Forecast News: जाणून घ्या हा सामना रद्द झाल्यास कसा लावला जाईल निकाल.

Ankush Dhavre

India vs New Zealand Weather Forecast News:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील २१ वा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना धरमशाळेतील हिमाचल क्रिकेच असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना दुपारी २ वाजता सुरू होणार आहे.

या महत्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. हा सामना रद्द होण्याची किंवा सामन्यातील षटकं कमी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, यामागचं प्रमुख कारण म्हणजे पाऊस.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

Accuweather च्या अहवालानूसार, आज होणाऱ्या सामन्यात कमाल तापमान १८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ११ अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे.

सकाळी १० ते १ च्या दरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सामन्यावेळी ढगाळ वातावरण असेल तर वाऱ्याचा वेग ताशी २६ किमी इतका असू शकतो.

क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी..

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना हा दुपारी २ वाजता सुरू आहे. यावेळी पाऊस पडण्याची शक्यता ही ५१ टक्के इतकी असणार आहे. तर दुपारी ३ वाजता पाऊस पडण्याची शक्यता ४७ टक्के इतकी असणार आहे.

क्रिकेट चाहत्यांना दिलासा देणारी बातमी अशी की, दुपारी ३ नंतर पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी होईल. ही शक्यता २ टक्क्यांवर येईल. पावसाने व्यत्तय आणल्यास सामना उशिराने सुरू होऊ शकतो. (Latest sports updates)

भारत आणि न्यूझीलंड सामना रद्द झाला तर काय?

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत साखळी फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्तेकी १-१ गुण दिला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT