India vs New Zealand, Hardik Pandya / @ICC SAAM TV
Sports

Ind Vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी हार्दिक पंड्या बरंच काही बोलून गेला, सांगितल्या ५ महत्वाच्या गोष्टी

टी २० वर्ल्डकप स्पर्धेतील पराभव मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आहे.

Nandkumar Joshi

India vs New Zealand : न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या टी २० मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. वेलिंग्टनमध्ये पहिला सामना होत आहे. या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व हार्दिक पंड्या करणार आहे. या मालिकेपूर्वीच कर्णधार हार्दिक पंड्याने महत्वाच्या गोष्टींवर भाष्य केले आहे. टी २० वर्ल्डकप स्पर्धेतील पराभव मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या टी २० वर्ल्डकपचा रोडमॅप सुरू झाला आहे. सर्व युवा खेळाडूंना संघात स्थान मिळवून देण्यासाठी पूर्णपणे संधी दिली जाईल, असे हार्दिक म्हणाला.

यंदाच्या टी २० वर्ल्डकप स्पर्धेत सेमिफायनलमध्येच भारताचं (Team India) आव्हान संपुष्टात आलं. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. सुपर १२ मधील सामन्यांत पाचपैकी चार सामने जिंकले होते. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या टीम इंडियाला रिकाम्या हाती माघारी परतावे लागले. मैदानावर आणि मैदानाबाहेरही टीम इंडियाचे अनेक खेळाडू ही खंत व्यक्त करताना दिसले होते. (Cricket News)

आता पुढची टी २० वर्ल्डकप स्पर्धा वेस्टइंडीज आणि अमेरिकेत खेळवली जाणार आहे. भारतीय टी २० संघात अनेक बदल होतील असे दिसते. विराट कोहली-रोहित शर्मा यांसारखे खेळाडू त्यावेळी या स्पर्धेत खेळतील की नाही हे आताच सांगता येणार नाही. त्यात आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे दिले आहे. त्यानंतर आगामी काळात मोठे बदल घडण्याचे संकेतही हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) दिले आहेत.

हार्दिक पंड्यानं सांगितलेल्या ५ महत्वाच्या गोष्टी

पुढील टी २० वर्ल्डकप स्पर्धेला अद्याप दोन वर्षे आहेत. आमच्याकडे नवं टॅलेंट शोधण्यासाठी पुरेसा वेळ आहे. त्या दरम्यान खूप क्रिकेट खेळलं जाईल. अनेक खेळाडूंना संधी मिळेल. सिनिअर खेळाडू इथे नाहीत. पण ज्यांची निवड झालीय ते किमान दोन वर्षांपासून खेळत आहेत. त्यांना खूप संधी दिली आहे. त्यात त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांचा खेळ बघण्यास उत्सुक आहे. नवीन खेळाडू, नवी ऊर्जा आणि नवीन रोमांच...

२०२४ मध्ये टी २० वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. आतापासूनच त्याचा रोडमॅप सुरू झाला आहे. पण आता खूपच घाई होईल. आमच्याकडे खूप वेळ आहे. आता सर्व खेळाडूंनी न्यूझीलंडविरुद्ध खेळण्याचा आनंद लुटावा असे वाटते. भविष्याच्या बाबतीत पुढे बोलणे होईलच.

अनेक खेळाडूंसाठी ही मालिका खूपच महत्वाची आहे. जो चांगला खेळेल, तो दावेदारी मजबूत करेल.

टीम इंडियाला काही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. चांगला खेळला नाही तर टीका करणारच. प्रत्येक जण चांगलं खेळण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांना काही सिद्ध करण्याची गरज नाही.

आता टी २० वर्ल्डकप स्पर्धेत झालेला पराभव मागे सारून पुढे जाण्याची वेळ आहे. आता यापुढे चांगली कामगिरी करावी लागेल. झालेल्या चुका सुधाराव्या लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: भीषण अपघात; शंभरच्या स्पीडनं धावणाऱ्या ट्रकच्या धडकेत २ रिक्षांचा चक्काचूर, ५ जणांचा जागीच मृत्यू

शिक्षकांची परीक्षा; इलेक्शन ड्युटी होणार रद्द

Maharashtra Live News Update: वणी-सप्तशृंगी गड मार्गावर भीषण अपघात, थार कारची तीन वाहनांना धडक

Chanakya Niti: न लढता शत्रूला हरवायचंय? मग चाणक्यांच्या या 7 गोष्टी ठेवा लक्षात

राजकारणाचा विचका झालाय; राष्ट्रवादीचा अध्यक्ष 'पाटील' असावा, पटेल नाही, सुनेत्रा पवारांनी शपथ घेताच राज ठाकरेंची पोस्ट

SCROLL FOR NEXT