Team India: भारतीय संघात होणार मोठे बदल, रोहित शर्मा, विराट कोहली बाहेर जाणार? कारण...

सोशल मीडियासह भारतीय क्रिकेट नियामक मंडळात टीम इंडियाला धारेधर धरलं जातंय, कारण...
Indian cricket team, BCCI
Indian cricket team, BCCIsaam tv

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने सेमीफायनल सामन्यात 10 विकेट्स राखून भारताचा दारूण पराभव केला. त्यानंतर सोशल मीडियासह भारतीय क्रिकेट नियामक मंडळात टीम इंडियाला धारेधर धरलं जात आहे. बीसीसीआय (BCCI) आता कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. आता एका वर्षाच्या आत टीम इंडियात खूप मोठे बदल पाहायला मिळू शकतात. (Big changes possibilities in indian cricket team within a year)

Indian cricket team, BCCI
T20 World Cup: भारत वर्ल्डकपमधून बाहेर, सोशल मीडियावर टीम इंडिया ट्रोल, खेळाडूंवर चाहते भडकले

पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली की, फिरकीपटू रवीचंद्रन आश्विन आणि विकेटकीपर दिनेश कार्तिकचा हा शेवटचा वर्ल्डकप असेल. याशिवाय (Rohit Sharma) रोहित शर्मा आणि विराट कोहलीला (virat kohli) कालांतराने टीम इंडियातून बाहेर केलं जाईल. दरम्यान, क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय निर्णय खेळाडूंनाच करावा लागेल.

इंग्लंड विरुद्ध झालेल्या मोठ्या पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा खूपच नैराश्यात होता. त्यावेळी टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी रोहितला धीर दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील टी20 वर्ल्डकप आता दोन वर्षानंतर होणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय भविष्यातील कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्याकडे सोपवू शकते.

Indian cricket team, BCCI
Rohit Sharma Captaincy : रोहित शर्माचे कर्णधारपद धोक्यात? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

निवृत्ती घेणं खेळाडूचा वैयक्तीक निर्णय

बीसीसीआय कोणत्याही खेळाडूला निवृत्त होण्याबाबत बोलणार नाही. तो त्या खेळाडूचा वैयक्तिक निर्णय असतो. मात्र, पुढील टी20 वर्ल्डकप 2023 पर्यंत वरिष्ठ खेळाडू टेस्ट आणि वनडे क्रिकेट खेळताना दिसतील. त्यामुळे आगामी होणाऱ्या टी20 वर्ल्डकपमध्ये युवा खेळाडूंना टीम इंडियात खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.

राहुल द्रविड यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या भविष्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.त्यावेळी द्रविड म्हणाले, सेमीफायनलच्या या सामन्यानंतर यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही. हे खेळाडू आपल्यासाठी जबरदस्त प्रदर्शन करत आहेत. आमच्याकडे बदल आणि विचार करण्यासाठी खूप वेळ आहे.

वर्ल्डकपमध्ये रोहित-कोहली-आश्विनची कामगिरी

विराट कोहली आणि रोहित शर्मा 35 वर्षांचे झाले आहेत. कोहलीने या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत सहा सामन्यांत सर्वात जास्त 296 धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी 98.66 एवढी राहिली आहे. कोहलीने चार अर्धशतक ठोकले आहेत. तर रोहित शर्माने सहा सामन्यांत 19.33 च्या सरासरीनं फक्त 116 धावा केल्या आहेत. तर अनुभवी फिरकीपटू आश्विनने सहा सामन्यांत फक्त सहा विकेट्स घेतल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com