team india saam tv
Sports

IND vs NZ, 1st Inning: शमीच्या वादळापुढं न्यूझीलंड ढेपाळली! टीम इंडियाला विजयाचं 'पंचक' साजरं करण्यासाठी २७४ धावांचं आव्हान

India vs New Zealand Live Score: या सामन्यात मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे .

Ankush Dhavre

India vs New Zealand Live Score:

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना धरमशाळेच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान डॅरिल मिशेलच्या शतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने २७३ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ५ गडी बाद केले. भारतीय संघाला न्यूझीलंडचा विजयरथ रोखण्यासाठी २७४ धावांची गरज आहे.

न्यूझीलंडने केल्या २७३ धावा...

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवत चांगली सुरुवात करून दिली. मोहम्मद सिराजने डेवोन कॉनवेला शून्यावर बाद करत माघारी धाडले. त्यानंतर शमीने विल यंगला १७ धावांवर बाद करता माघार धाडले.

रचिन रविंद्र आणि डॅरिल मिशेलने मिळून १५९ धावांची भागीदारी केली. या भागीदारीसह दोघांनी न्यूझीलंडला मजबूत स्थितीत पोहचवलं. (Latest sports updates)

डॅरिल मिशेलने १२७ चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि ५ षटाकारांच्या साहाय्याने सर्वाधिक १३० धावांची खेळी केली. रचिन रविंद्रने ८७ चेंडूंचा सामना करत ७५ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि १ षटकार मारला.

शमीचं पंचक..

यापूर्वी झालेल्या चारही सामन्यांमध्ये मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरला बाहेर करून मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं आहे. या संधीचा फायदा घेत त्याने पहिल्याच सामन्यात ५ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने विल यंग, रचिन रविंद्र, डॅरिल मिशेल, मिचेल सॅंटनर आणि हेनारीला बाद करत माघारी धाडलं. आपल्या १० षटकात त्याने ५४ धावा खर्च करत ५ विकेट्स घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT