varun chakrawarthy twitter
Sports

IND vs NZ, Highlights: दुबईत वरुणचा 'पंच' भारताचा किवींवर दणदणीत विजय; या संघासोबत सेमीफायनलमध्ये भिडणार

India vs New Zeland Highlights: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली आहे. यासह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

Ankush Dhavre

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना पार पडला. या दोन्ही संघांनी सेमीफायनलमध्ये आपलं स्थान आधीच निश्चित केलं होतं.

ही लढत पॉईँट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कोणता संघ जाणार, यासाठी होती. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २४९ धावा केल्या. दरम्यान या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला २०५ धावा करता आल्या. दरम्यान हा सामना भारतीय संघाने ४४ धावांनी आपल्या नावावर केला.

भारतीय संघाने केल्या २४९ धावा

या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळालं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. कारण, रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर विराट कोहलीने पॅव्हेलियनची वाट धरली.

सुरुवातीला ३ धक्के बसल्यानंतर अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यरने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून अर्धशतकी भागिदारी केली. श्रेयसकडे शतक झळकाण्याची संधी होती. मात्र तो ७९ धावा करत माघारी परतला. तर अक्षर पटेल ४२ धावा करत माघारी परतला. शेवटी हार्दिकने ४५ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २४९ धावांवर पोहोचवली.

भारताचा दमदार विजय

या सामन्यात न्यूझीलंडला विजय मिळवण्यासाठी २५० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडला रचिन रविंद्रच्या स्वरुपात पहिला धक्का बसला. तो अवघ्या ६ धावा करत माघारी परतला. तर विल यंगने २२ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून कुठलाच फलंदाज फार काळ मैदानावर टीकू शकला नाही. एकट्या केन विलियन्मसनने शेवटपर्यंत झुंज दिली.

त्याने या डावात ८१ धावा चोपल्या. मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. विलियमन्सनला वगळलं तर इतर कुठलाही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही. दरम्यान भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ५ गडी बाद केले. या न्यूझीलंडचा संपूर्ण डाव अवघ्या २०५ धावांवर आटोपला. यासह भारताने हा सामना ४४ धावांनी आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT