
India Vs New Zealand Live : चॅम्पियन्स ट्रॉफीमधला भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना आज दुबईत खेळला जाणार आहे. सामन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. सामन्यापूर्वी नाणेफक झाली आहे. नाणेफेक न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सँटनरने जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक झाल्यानंतर लगेचच प्लेईंग ११ ची घोषणा करण्यात आली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात आज भारतीय संघात एकमेव बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या जागी फिरकीपटू वरूण चक्रवर्तीला संधी देण्यात आली आहे. या एका बदलाशिवाय संघात एकही बदल झालेला नाही. न्यूझीलंडच्या हिशोबाने भारताचे आजच्या सामन्यातील पारडे जड असल्याचे लोक म्हणत आहेत.
भारताची प्लेईंग ११
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव.
न्यूझीलंडची प्लेईंग ११
विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरोरके.
भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यामध्ये पाकिस्तानवर मात मिळवली. आजच्या तिसऱ्या सामन्यामध्येही भारताचा विजयी रथ असाच पुढे जाईल असा चाहत्यांना विश्वास आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडने देखील त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत. तेव्हा आजचा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.