
वरुण चक्रवर्तीने सँटनरला बाद करत न्यूझीलंडला आठवा धक्का दिला आहे.
केन विलियम्सनने एक बाजू धरुन ठेवली होती. मात्र तो ८१ धावांवर तंबूत परतला.
वरुण चक्रवर्तीने न्यूझीलंडला सहावा धक्का दिला आहे.
कुलदीप यादवने डॅरिल मिचेलला बाद करत माघारी धाडलं आहे.
वरुण चक्रवर्तीने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला आहे. यंग स्वस्तात माघारी परतला आहे.
रचिन रविंद्र ६ धावा करत माघारी परतला आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने २४९ धावा केल्या आहेत.
भारतीय संघाच्या २०० धावा पूर्ण झाल्या आहेत.
भारतीय संघाला सहावा धक्का बसला आहे. केएल राहुल २३ धावांवर बाद झाला आहे.
भारतीय संघाला पाचवा धक्का बसला. श्रेयस अय्यर ७९ धावांवर तंबूत परतला आहे.
या डावात अक्षर पटेलने शानदार फलंदाजी केली. मात्र अर्धशतकाच्या जवळ असताना अक्षर बाद होऊन माघारी परतला.
या डावात फलंदाजी करताना श्रेयस अय्यरने ७५ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
भारतीय संघाला अवघ्या ३० धावांवर ३ धक्के बसले होते. त्यानंतर अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यरने मिळून भरतीय संघाचा डाव सांभाळला.
भारतीय संघाला सुरुवातीला ३ मोठे धक्के बसले होते. मात्र अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यरने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला.
टीम इंडियाला ३० रन्सवर तिसरा धक्का बसला आहे. रोहित १५ रन्स करून बाद झाल्यानंतर विराट कोहलीची विकेट पडली. विराट ११ रन्सवर आऊट झाला आहे.
शुभमन गिलच्या स्वरूपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला आहे. अवघे २ रन्स करून गिल माघारी परतला
विराट कोहली आज 300 वा वनडे आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. अशी कामगिरी करणारा तो सातवा भारतीय खेळाडू ठरणार आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, हर्षित राणा, कुलदीप यादव.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुबई क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. 25 वर्षांनंतर दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांनी आधीच उपांत्य फेरी गाठली असली तरी अव्वल स्थान गाठण्यासाठी विजय गरजेचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.