IND vs NZ: केन विलियम्सनने घेतला Champions Trophy स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच; जडेजाही झाला शॉक- VIDEO

Kane Williamson Catch: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात रविंद्र जडेजाला बाद करण्यासाठी केन विलियम्सनने अविश्वसनिय झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीाडियावर व्हायरल होतोय.
IND vs NZ: केन विलियम्सनने घेतला Champions Trophy स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच; जडेजाही झाला शॉक- VIDEO
kane williamsontwitter
Published On

न्यूझीलंडचे फलंदाज आणि भन्नाट कॅचेस हे समीकरण काही नवीन नाही. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी असे असे कॅचेस पकडले आहेत, ज्याचा कोणी विचारही करु शकत नाही. असाच काहीसा नजराणा भारत- न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यातही पाहायला मिळाला आहे. दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सनने अविश्वसनिय कॅच घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

IND vs NZ: केन विलियम्सनने घेतला Champions Trophy स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच; जडेजाही झाला शॉक- VIDEO
IND vs NZ 1st Inning: हार्दिकची हार्ड हिटिंग! अय्यरचं तुफानी अर्धशतक; भारताने किवींसमोर ठेवलं मोठं आव्हान

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साखळी फेरीतील शेवटचा सामना दुबईत पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच ३ मोठे धक्के बसले. रोहित आणि गिल स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर विराटनेही पॅव्हेलियनची वाट धरली. विराट कोहलीला बाद करण्यासाठी ग्लेन फिलिप्सने भन्नाट कॅच घेतला. जे पाहून विराट कोहलीलाही शॉक बसला. ग्लेन फिलिप्सने घेतलेल्या कॅचनंतर शेवटी केन विलियम्सननेही भन्नाट झेल घेतला.

IND vs NZ: केन विलियम्सनने घेतला Champions Trophy स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच; जडेजाही झाला शॉक- VIDEO
Ind Vs Nz : विराट कोहलीची विकेट पडली अन् अनुष्का शर्माने भर स्टेडियममध्ये काय केलं? पाहा व्हायरल व्हिडीओ

तर झाले असे की, न्यूझीलंडची गोलंदाजी सुरु असताना ४६ वे षटक टाकण्यासाठी मॅट हेनरी गोलंदाजी करत होता. त्यावेळी रविंद्र जडेजा स्ट्राईकवर होता. मॅट हेनरीने टाकलेल्या चेंडूवर रविंद्र जडेजाने कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा फटका फसला. इतर कुठला क्षेत्ररक्षक असता, तर हा चेंडू निघून गेला असता,मात्र केन विलियम्सनने डाईव्ह मारली आणि भन्नाट कॅच घेतला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

IND vs NZ: केन विलियम्सनने घेतला Champions Trophy स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच; जडेजाही झाला शॉक- VIDEO
IND vs NZ: टीम इंडियाचा टॉप ऑर्डर कोसळला! ३०० व्या सामन्यात विराट फेल, रोहित - गिल स्वस्तात माघारी

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव.

न्यूझीलंडची प्लेईंग ११

विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरोरके.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com