
India vs New Zealand Live Score: भारत- न्यूझीलंड सामना आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाचं फलंदाजातील त्रिकूट फोडून काढणं हे नवीन नाही. जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने येतात. तेव्हा न्यूझीलंडचे गोलंदाज भारतीय फलंदाजांची चांगलीच कसोटी घेतात. यावेळीही असच काहीसं चित्र पाहायला मिळालं आहे.
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात खेळण्यासाठी आमनेसामने आले होते. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारतीय फलंदाजांना प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. मात्र सुरुवातीलाच भारतीय संघाला ३ मोठे धक्के बसले.
रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे तो या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती समोर आली होती. मात्र रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आली. मात्र या जोडीला हवी तशी सुरुवात करुन देता आली नाही. भारताला अवघ्या १५ धावसंख्येवर पहिला मोठा धक्का बसला.
शुभमन गिल अवघ्या २ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर रोहित शर्माला खेळपट्टीवर फार काळ टीकून राहता आलं नाही. रोहित अवघ्या १५ धावा करत माघारी परतला. सलामी जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर संपूर्ण जबाबदारी विराट कोहलीवर होती. विराट आपल्या वनडे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३०० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.
मात्र त्यालाही आपली छाप सोडता आली नाही. विराटने काही आकर्षक शॉट्स मारले. मात्र ग्लेन फिलिप्सने घेतलेल्या शानदार झेलमुळे विराटला अवघ्या ११ धावांवर तंबूत परतावं लागलं. यासह अवघ्या ३० धावांवर भारताचे ३ प्रमुख फलंदाज तंबूत परतले होते.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव.
न्यूझीलंडची प्लेईंग ११
विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरोरके.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.