virat kohli twitter
Sports

IND vs NZ 2nd Test: ‘एक दम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए’ एकाच सेशनमध्ये भारताचा डाव गडगडला

India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावातही भारताचे ७ फलंदाज माघारी परतले आहेत.

Ankush Dhavre

India vs New Zealand 2nd Test, Day 2: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

वॉशिंग्टन सुंदरच्या शानदार फिरकीच्या बळावर न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या २५९ धावांवर आटोपला. भारतीय फिरकी गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलंच रडवलं. आता न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजींनीही भारतीय फलंदाजांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

भारताचा अर्धा संघ तंबूत

भारतीय संघाने पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा डाव २५९ धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर भारतीय संघाला शेवटचे काही षटक फलंदाजी करण्याची संधी मिळाली. भारताने पहिल्या दिवशी १६ धावा जोडल्या. मात्र रोहितच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. रोहित शून्यावर माघारी परतला.

सामन्यातील दुसऱ्या दिवशी (२५ ऑक्टोबर) शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालने भागीदारी करत चांगली सुरुवात करुन दिली. मात्र ही भागीदारी फार काळ टीकू शकली नाही. शुभमन गिल ३० धावा करत माघारी परतला. गिल बाद झाल्यानंतर विराट कोहलीही एक धाव करत माघारी परतला.

संघातील प्रमुख फलंदाज माघारी परतल्यानंतर जयस्वाल आणि पंतवर मोठी जबाबदारी होती. मात्र जयस्वालही ३० धावांवर माघारी परतला. आता सर्व जबाबदारी रिषभ पंत आणि सरफराज खानवर होती.

मात्र रिषभ पंत १८ आणि सरफराज खान ११ धावांवर माघारी परतले. सुरुवातीच्या २ तासातच भारताचे ७ फलंदाज माघारी परतले. त्यानंतर आर अश्विनही स्वस्तात माघारी परतला. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सँटनरने भारतीय फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. लंचपर्यंत भारतीय संघाला ७ गडी बाद १०७ धावा करता आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

Snehalata Vasaikar: गिरिजा ओकनंतर ही अभिनेत्री होतेय व्हायरल, सौंदर्याने केलं मार्केट जाम

SCROLL FOR NEXT