IND vs NZ: 7 विकेट्स घेताच वॉशिंग्टन सुंदरने रचला इतिहास! दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान

Washinton Sundar Record: वॉशिंग्टन सुंदरने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ७ गडी बाद केले. यासह त्याच्या नावे एका खास रेकॉर्डची नोंद झाली आहे.
IND vs NZ: 7 विकेट्स घेताच वॉशिंग्टन सुंदरने रचला इतिहास! दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान
washington sundar twitter
Published On

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीचा कहर पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या कसोटीसाठी सुंदरला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळालं आणि या संधीचा त्याने चांगलाच फायदा घेतला. या डावात गोलंदाजी करताना त्याने रचिन रविंद्र,टॉम ब्लंडेल आणि टीम साऊदीसारख्या फलंदाजांना बाद केलं. त्याने या डावात एकूण ७ गडी बाद केले.

या सामन्यातील दुसऱ्या सेशनचा शेवट आणि तिसरा सेशन वॉशिंग्टन सुंदरने गाजवला. त्याने गोलंदाजी करताना वनसाईड ७ गडी बाद केले आणि भारतीय संघाला कमबॅक करुन दिलं. हे ७ गडी त्याने अवघ्या ५९ धावा खर्च करत बाद केले. यासह त्याने दिग्गज गोलंदाजांच्या यादीत प्रवेश केला आहे. भारतात कसोटी क्रिकेट खेळताना असं पहिल्यांदाच घडलंय की, कुठल्याही ऑफ स्पिनरने सर्व १० गडी बाद केले आहेत.

IND vs NZ: 7 विकेट्स घेताच वॉशिंग्टन सुंदरने रचला इतिहास! दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान
IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत सर्वश्रेष्ठ कामगिरी करणारे गोलंदाज

  • एस वेंकटराघवन (१९६५) - ८/७२

  • ईएएस प्रेसन्ना (१९७५) - ८/७६

  • आर अश्विन (२०१७) - ७/५९

  • वॉशिंग्टन सुंदर (२०२४)- ७/५९

भारतात कसोटी क्रिकेट खेळताना पहिल्या डावातील सर्व १० गडी बाद करणारे फिरकी गोलंदाज

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड- २०२४

  • भारत विरुद्ध इंग्लंड- २०२४

  • भारत विरुद्ध इग्लंड - १९७३

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया -१९६४

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- १९५६

  • इंग्लंड विरुद्ध भारत- १९५२

IND vs NZ: 7 विकेट्स घेताच वॉशिंग्टन सुंदरने रचला इतिहास! दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान
IND vs NZ: सुंदरचा 'मॅजिकल बॉल',भारताला नडणाऱ्या रचिनला असा दाखवला इंगा; पिचवर नेमकं काय घडलं?

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून डेवोन कॉनव्हेने ७६ धावांची खेळी केली. तर रचिन रविंद्र ६५ धावा करत माघारी परतला. या डावात वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाजी करताना सर्वाधिक ७ गडी बाद केले. या गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडचा डाव २५९ धावांवर आटोपला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com