india vs ireland google
Sports

IND vs IRE, Head To Head Record: टीम इंडियासमोर आयर्लंड संघाचं आव्हान! कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

India vs Ireland, Head To Head Record In T20 World Cup :भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. दरम्यान कसा राहिलाय या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. पहिल्याच सामन्यात अमेरिकेने कॅनडावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या सामन्यापूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ६० धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघ साखळी फेरीत आपला पहिला सामना आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे. दरम्यान कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात भारतीय संघासह पाकिस्तान, अमेरिका, आयर्लंड आणि कॅनडा या संघाचा देखील समावेश आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड विरुद्ध रंगणार आहे. तर ९ जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. त्यानंतर भारतीय संघ १२ जून रोजी अमेरिका तर १५ जून रोजी कॅनडा सोबत दोन हात करताना दिसेल.

कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मजबूत संघांपैकी एक आहे. भारतीय संघाने आयर्लंडविरुद्ध ७ सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे विजयाचं पारडं भारतीय संघाच्या बाजूनं झुकल्याचं दिसून येत आहे.

भारत आणि आयर्लंड हे दोन्ही संघ टी -२० वर्ल्डकपमध्ये आमने-सामने येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी २००९ मध्ये देखील या दोन्ही संघांमध्ये सामना रंगला होता. त्यावेळी एमएस धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. त्या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला होता. मुख्य बाब म्हणजे तत्कालीन कर्णधार रोहित शर्माने त्या सामन्यात ५२ धावांची खेळी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT