india vs england test series record both teams together created big record of scoring most sixes in test series  twitter
क्रीडा

IND vs ENG 5th Test Record: IND vs ENG कसोटी मालिका ठरली ऐतिहासिक! १४८ वर्षांत पहिल्यांदाच मारले गेले इतके षटकार

Most Sixes In Test Series Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका रेकॉर्डब्रेकिंग ठरली आहे. या मालिकेत अनेक मोठे रेकॉर्ड्स बनवले आणि मोडले गेले आहेत.

Ankush Dhavre

India vs England 5th Test,Most Sixes Record:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका रेकॉर्डब्रेकिंग ठरली आहे. या मालिकेत अनेक मोठे रेकॉर्ड्स बनवले आणि मोडले गेले आहेत. दरम्यान या कसोटी मालिकेत सर्वांना आश्चर्यचकीत करणारा रेकॉर्ड बनवला गेला आहे. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडलं आहे. काय आहे रेकॉर्ड? जाणून घ्या.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला गेला आहे. दोन्ही संघातील फलंदाजांनी गोलंदाजांवर हल्लाबोल केला आहे. दोन्ही संघातील फलंदाजांनी मिळून १०० पैकी अधिक षटकार मारले आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे.

१०० व्या कसोटीत बेअरस्टोने मारला १०० वा षटकार..

जॉनी बेअरस्टो आपला १०० वा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे.दरम्यान १०० व्या सामन्यात त्याने १०० वा षटकार मारला आहे. त्याने अश्विनच्या गोलंदाजीवर १०० वा षटकार मारला. मात्र आपल्या १०० व्या कसोटीत त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो ३१ चेंडूत ३९ धावा करत माघारी परतला. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले. त्यानंतर कुलदीप यादवने त्याला पायचित करत माघारी धाडलं. (Cricket news in marathi)

भारतीय संघाचा विजय...

या सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि ६४ धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४७७ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून शुभमन गिलने ११० धावांनी खेळी केली. रोहित शर्माने १०३ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव अवघ्या १९५ धावांवर संपुष्टात आला. यासह भारतीय संघाने ६४ धावांनी विजयाची नोंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT