india vs england 3rd test saam tv news
Sports

IND vs ENG, Test Series: राजकोटमध्ये अश्विन -जडेजा ठरणार ट्रम्पकार्ड! खेळपट्टीबाबत समोर आली मोठी अपडेट

India vs England 3rd Test Pitch Report: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये राजकोटच्या मैदानावर तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे

Ankush Dhavre

India vs England 3rd Test, Pitch Report:

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs ENG) या दोन्ही संघांमध्ये राजकोटच्या मैदानावर तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे.

मालिकेतील तिसरा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान राजकोटची खेळपट्टी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार की फलंदाजांची चांदी होणार? असे अनेक प्रश्व उपस्थित होत आहेत. दरम्यान राजकोटच्या खेळपट्टीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

राजकोटच्या खेळपट्टीबाबत समोर आली मोठी अपडेट..

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, राजकोटच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकतो. एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘भारतीय टीम मॅनेजमेंट स्लो टर्न होणाऱ्या खेळपट्टीवर खेळण्यास अधिक भर देण्याच्या प्रयत्नात असणार आहे.’ (IND vs ENG 3rd Test Pitch Report)

या सामन्याला १५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. तर या सामन्यापूर्वी म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी राजकोटच्या मैदानावर एक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात, भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या रविंद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजाराचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच या स्टेडियमचं नाव बदलून निरंजन शाह ठेवण्यात येणार आहे. (Cricket news in marathi)

राजकोटच्या मैदानावर कसा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड?

राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आतापर्यंत केवळ २ कसोटी सामने खेळले गेले आहेत. २०१६ मध्ये भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. हा सामना ड्रॉ राहिला होता.

तर २०१८ मध्ये झालेल्या सामन्यात भारत आणि वेस्टइंडिज हे दोन्ही संघ आमने सामने आल होते. या सामन्यात भारतीय संघाने वेस्टइंडिजवर १ डाव आणि २७२ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात विराट कोहलीने १३९ धावांची खेळी केली होती. तर पृथ्वी शॉ ने १३४ आणि रविंद्र जडेजाने नाबाद १०० धावांची खेळी केली होती.

भारत- इंग्लंड उर्वरीत ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (डब्ल्यूके), केएस भरत (डब्ल्यूके), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: 'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

SCROLL FOR NEXT