jasprit bumrah twitter
क्रीडा

IND vs ENG, 2nd Test: बुमराहच्या वादळात इंग्लंडचा संघ उद्ध्वस्त! दुसऱ्या दिवस अखेर टीम इंडियाकडे १७१ धावांची आघाडी

India vs England 2nd Test , Day 2: विशाखापट्टनमच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात पहिल्या दिवसापासून भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे.

Ankush Dhavre

IND vs ENG 2nd Test, Day 2 Highlights:

विशाखापट्टनमच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात पहिल्या दिवसापासून भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३९६ धावा केल्या.

तर या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा डाव भारतीय गोलंदाजांनी अवघ्या २५३ धावांवर गुंढाळला आहे. दरम्यान दुसऱ्या दिवस अखेर भारतीय संघाने पहिल्या डावात १७१ धावांची आघाडी घेतली आहे.

जसप्रीत बुमराहचं पंचक...

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३९६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर कुलदीप यादवने बेन डकेटला २१ धावांवर माघारी धाडत इंग्लंडला पहिला मोठा धक्का दिला.

इंग्लंडकडून झॅक क्रॉलीने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. तर कर्णधार बेन स्टोक्सने ४७ धावांची खेळी केली. या दोघांना वगळलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडकडून ओली पोपने २३,जॉनी बेअरस्टोने ४७ आणि टॉम हार्टलेने २१ धावा केल्या. (Cricket news in marathi)

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह चमकला. त्याने या डावात जसप्रीत बुमराहने ४५ धावा खर्च करत ६ गडी बाद केले. तर कुलदीप यादवने ७१ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तर अक्षर पटेलने २४ धावा खर्च करत १ गडी बाद केले .

भारतीय संघाने घेतली १७१ धावांची आघाडी..

इंग्लंडचा डाव २५३ धावांवर आटोपल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात आक्रमक सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवस अखेर यशस्वी जयस्वाल १५ धावांवर नाबाद आहे. तर रोहित शर्मा १३ धावांवर नाबाद आहे. यासह भारतीय संघाने दुसऱ्या डावात १७१ धावांची आघाडी घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Railtel Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT