rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma, IND vs ENG: पिक्चर अभी बाकी है.. हिटमॅन फॉर्ममध्ये परतला! अवघ्या इतक्या चेंडूत ठोकलं वादळी अर्धशतक

Rohit Sharma Half Century, IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली आहे.

Ankush Dhavre

पिक्चर अभी बाकी है.. सतत फ्लॉप, फलंदाजीतील बॅडलक हे सर्व मागे सोडून अखेर हिटमॅन फॉर्ममध्ये परतलाय. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली. इंग्लंडने दुसऱ्या वनडेत भारतीय संघासमोर विजयासाठी ३०५ धावांचे आव्हान ठेवले होते. आव्हान मोठं होतं, या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या जोडीने भारताला दमदार सुरुवात करुन दिली.

रोहितचं वादळी अर्धशतक

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडने ३०४ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. गेल्या काही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरलेल्या रोहितची बॅट या सामन्यात चांगलीच तळपली. रोहित आणि गिलने भारतीय संघाला शतकी भागीदारी करुन दमदार सुरुवात करुन दिली.

यादरम्यान रोहितने ३० चेंडूंचा सामना करत आपल्या वनडे कारकिर्दीतील ५८ वे अर्धशतक पू्र्ण केले. या अर्धशतकी खेळीदरम्यान त्याने ३ खणखणीत षटकार खेचले. यासह त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

रोहित गेल्या काही मालिकांमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्ध आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याची बॅठ शांतच राहिली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो २ अवघ्या २ धावा करत माघारी परतला होता. मात्र या सामन्यात अर्धशतकी खेळी करुन त्याने दमदार कमबॅक केलंय. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी रोहित शर्मा फॉर्ममध्ये येणं ही भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे.

षटकारांच्या रेकॉर्डमध्ये गेलला सोडलं मागे

रोहित शर्मा सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो. इंग्लंडविरुद्ध त्याची बॅट चांगलीच तळपली. फलंदाजीला येताच त्याने सुरुवातीपासून इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. दुसऱ्याच षटाकात षटकार खेचून रोहितने मोठा रेकॉर्ड मोडून काढला. रोहित वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. रोहितने आतापर्यंत ३३२ षटकार मारले आहेत. यादीत शाहीद आफ्रिदी अव्वल स्थानी आहे.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

शाहीद आफ्रिदी - ३५१ षटकार

रोहित शर्मा- ३३२ षटकार

ख्रिस गेल- ३३१ षटकार

सनाथ जयसूर्या- २७० षटकार

एमएस धोनी- २२९ षटकार

ओएन मॉर्गन - २२० षटकार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

Heel Pain: दररोज हिल सॅंडल घालता? संध्याकाळी 'हे' घरगुती उपाय करा, पायदुखी दूर राहील

Marathi bhasha Vijay Live Updates : थोड्याच वेळात ठाकरेंची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT