Rohit Sharma Angry On Two Player google
Sports

India vs England 2nd ODI: डोकं ठिकाण्यावर आहे का? भर मैदानात रोहित शर्मा दोन खेळाडूंवर भडकला

Rohit Sharma Angry On Two Player: रोहित शर्माने सामन्यात अक्षर पटेल, हर्षित राणा यांच्यावर रोहित शर्माने संतापला. टीम इंडियाची फील्डिंग चांगली होत नसल्याने रोहित शर्माने आपल्या खेळाडूंवर संताप व्यक्त केला.

Bharat Jadhav

भारत आणि इंग्लंडच्या दरम्यान झालेल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आपल्या संघातील खेळाडूंवर चांगलाच संतापला होता. रोहित शर्मा सामन्यादरम्यान अक्षर पटेल, हर्षित राणा, यांच्यावर भडकला होता. टीम इंडियाचं क्षेत्ररक्षण चांगलं होत नसल्यानं रोहित शर्माने आगपाखड केली. टीम इंडियाला 25व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जो रूटला बाद करण्याची संधी होती. शेवटच्या चेंडूवर रूट बाद झाला होता, पण अक्षर पटेलने रिव्ह्यू घेतला नाही त्यामुळे रूटला जीवदान मिळाले.

त्याआधीच्या एका षटकातही अक्षरने रुटला बाद करण्यासाठी अपील केली होती, पण अखेरच्या चेंडूवर जेव्हा बाद होण्याची शक्यता होती तेव्हाच त्याने अपील केली नाही, त्यामुळे रोहित शर्माची आगपाखड झाली. यानंतर 32 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जोस बटलर स्ट्राइकवर होता. बटलरचा चेंडू हर्षित राणाच्या हातात गेला. हर्षितने कोणताही संकोच न करता थेट चेंडू स्टंपच्या दिशेने आदळला. पण बटलर क्रीजवरच उभा होता.

स्टंपला चेंडू लागून तो थेट सीमेरेषेकडे गेला. त्याला रोखण्यासाठी कोणताच खेळाडू त्या दिशेला उभा नव्हता. हर्षितच्या या कृतीमुळे इंग्लंडच्या झोळीत ४ धावा गेल्या. त्यावरून रोहित शर्मा खूप चिडला.

भारताचा इंग्लडंवर दणदणीत विजय

कटकमध्ये भारताने इंग्लंडला धूळ चारलीय. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना कटकच्या बाराबाती स्टेडियममध्ये पार पडला.या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर विजयासाठी ३०५ धावांचे भलेमोठे आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. भारताने हा सामना ४ गडी राखून जिंकला.

शतक एक रेकॉर्ड अनेक

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात रोहितने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत वादळी शतक केलं. रोहितने ७६ चेंडूंचा सामना करत आपल्या वनडे कारकिर्दीतील ३२ वे शतक पूर्ण केले. त्याचबरोबर त्याने मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली.रोहितने सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये भारताचा दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला मागे सोडलंय. रोहितने आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करताच राहुल द्रविडचा रेकॉर्ड मोडला. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा गेलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT