India vs Bangladesh, Antigua weather report SAAM TV
Sports

IND vs BAN Weather Report : भारत - बांगलादेश सामना रद्द होणार? पाऊस 'खेळ' बिघडवणार, असा असेल हवामानाचा अंदाज!

T20 World Cup, Super 8, IND Vs BAN : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात आज महत्वाचा सामना होणार आहे. पण पावसाच्या अंदाजामुळं सामना होणार की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.

Nandkumar Joshi

टी २० वर्ल्डकप स्पर्धेत आज, शनिवारी भारत विरुद्ध बांगलादेश सामना होणार आहे. एंटीगुआच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार भारत - बांगलादेश सामना रात्री आठ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेकीसाठी दोन्ही संघांचे कर्णधार रोहित शर्मा आणि नजमुल हुसैन शान्तो हे अर्धा तास आधीच मैदानात येतील. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे.

कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याच्या इराद्यानं भारत मैदानात उतरेल. या विजयासह सेमिफायनलची दावेदारी भक्कम करण्याचा प्रयत्न असेल. तर बांगलादेश संघ विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे एंटीगुआमधल्या हवामानाकडं सर्वांच्या नजरा असतील. पाऊस या सामन्यात खेळ बिघडवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात एंटीगुआमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता सामना सुरू होईल. Accuweather च्या रिपोर्टनुसार, सकाळी १० ते ११ वाजताच्या दरम्यान पावसाची शक्यता ५० टक्के आहे. त्यानंतर आकाश निरभ्र राहील. त्यामुळे सुरुवातीलाच पाऊस पडून खेळ बिघडण्याची शक्यता आहे. मात्र, सामना पूर्ण खेळवण्याची शक्यता अधिक आहे, असे सांगितले जाते.

तत्पूर्वी, याच मैदानात बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला होता. पावसामुळं हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियानं डीएलएसनुसार विजय मिळवला होता.

हेड टू हेड रेकॉर्ड

टी २० क्रिकेटमध्ये बांगलादेशवर भारतीय संघानं वर्चस्व मिळवलेलं आहे. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या १४ पैकी १३ सामन्यांत भारतानं विजय मिळवला आहे. एकाच सामन्यात बांगलादेश संघानं भारताला पराभूत केलं आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघाचं पारडं जड असल्याचं मानलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT