team india twitter
Sports

IND vs BAN 1st Test: चेन्नईत लोकल बॉय चमकला! आधी शतक, मग गोलंदाजीत पंचक; टीम इंडियाचा शानदार विजय

India vs Bangladesh 1st test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ करत विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

India vs Bangladesh 1st Test Highlights: अश्विनचं शतक आणि दुसऱ्या डावात अश्विनचं पंचक, अखेर भारताने पहिल्या कसोटीत बांगलादेशला धूळ चारली आहे. भारताने दिलेल्या ५१५ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या फलंदाजांनी २३४ धावांवर दम तोडला. दरम्यान हा सामनात जिंकत भारतीय संघाने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. हा निर्णय बांगलादेशच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत, सुरुवातीलाच भारतीय संघाला ३ मोठे धक्के दिले.

विराट,रोहित आणि गिल स्वस्तात माघारी परतल्यानंतर यशस्वी आणि रिषभने भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं. त्यानंतर जडेजा आणि अश्विनने १९९ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला ३७६ धावांपर्यंत मजल मारुन दिली.

बांगलादेशचा डाव १४९ धावांवर आटोपला.

भारतीय संघाचा पहिला डाव ३७६ धावांवर आटोपल्यानंतर बांगलादेशचा संघ फलंदाजी करण्यासाठी आला. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशलाही सुरुवातीला मोठे धक्के दिले. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली. तर मेहदी हसनने २७ धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ गडी बाद केले. या शानदार गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर हाणून पाडला.

भारतीय संघाने उभारला २८७ धावांचा डोंगर

पहिल्या डावात मोठी आघाडी घेतल्यानंतर ,भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावातही शानदार कामगिरी केली. भारतीय संघाकडून शुभमन गिलने नाबाद ११९ धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने १०९ धावांची खेळी केली. या दोघांनी मिळून भारताला ५१४ धावांची आघाडी मिळवून दिली.

आर अश्विन चमकला

भारतीय संघाने बांगलादेशला जिंकण्यासाठी ५१४ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना नजमुल हुसेन शांतोने ८२ धावांची झुंजार खेळी केली. पण त्याला इतर कुठल्याही फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. भारताकडून गोलंदाजी करताना अश्विनने ६ तर जडेजाने ३ गडी बाद केले. या शानदार गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशचा डाव अवघ्या २३४ धावांवर आटोपला. भारतीय संघाने हा सामना २८० धावांनी आपल्या नावावर केला. यासह मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT