IND vs BAN 1st Test: विराट कोहलीचा जलवाच भारी! १७ धावा केल्या तरी तोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

Virat Kohli : बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात किंग कोहलीला चांगला खेळ करता आल नाहीये. पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात फक्त १७ धावा तो करू शकला नाहीये. पण जरी विराट कोहलीने १७ केल्या तरी असतील तरी सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडीत काढलाय.
IND vs BAN 1st Test: विराट कोहलीचा जलवाच भारी! १७ धावा केल्या तरी तोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम
Virat Kohli
Published On

प्रदीर्घ विश्रांतीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीसाठी बांगलादेशविरुद्धातील कसोटी मालिका खूप महत्त्वाची आहे. मात्र चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळण्यात येत असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला डाव चांगला राहिला नाही. पहिल्या डावात विराट कोहलीने ६ धावा केल्या तर दुसऱ्या डावात त्याला फक्त १७ धावा करत्या आल्या. पण १७ धावा जरी त्याने केल्या असतील तरी त्याने एक मोठा विक्रम तोडलाय. हा विक्रम होता सचिन तेंडुलकरचा.

कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशातील मैदानावर सर्वात कमी डावात १२००० धावांचा टप्पा पार करणारा खेळाडू बनलाय. यात कोहलीने सचिनसह पॉन्टिंग आणि कॅलिसला मागे टाकले आहे. चेन्नई कसोटीत टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात विराट कोहली ५ वी धाव पूर्ण करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशातील मैदानावर सर्वात कमी डावात १२००० धावा पूर्ण करणारा खेळाडू बनलाय. कोहलीने हा कारनामा फक्त २४३ डावांमध्ये केला.

IND vs BAN 1st Test: विराट कोहलीचा जलवाच भारी! १७ धावा केल्या तरी तोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम
Shubman Gill: शतक ठोकत शुबमनची सचिन-कोहलीच्या अनोख्या क्लबमध्ये एन्ट्री, बाबरलाही पिछाडलं

तर सचिन तेंडुलकरला १२००० धावा करण्यासाठी २६७ डावात फलंदाजी करावी लागली होती. देशातील मैदानावर भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली केवळ सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. सचिनने १४१९२ धावा केल्या आहेत, तर कोहलीने आतापर्यंत १२०२ धावा केल्या आहेत.

देशातील मैदानात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात १२ हजार धावा पूर्ण करणारे खेळाडू

विराट कोहली - २४३ डाव

सचिन तेंडुलकर - २६७ डाव

कुमार संगकारा- २६९ डाव

जॅक कॅलिस- २७१

रिकी पॉटिंग - २७५ डाव

IND vs BAN 1st Test: विराट कोहलीचा जलवाच भारी! १७ धावा केल्या तरी तोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम
IND vs BNG 1st Test: खराब प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला; विजयासाठी भारताला हव्यात ६ विकेट

देशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याच्या बाबतीत कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या नंबरवर सचिन तेंडुलकर , दुसऱ्या क्रमांकावर रिकी पॉटिंग असून त्याने १३११७ धावा केल्यात. तिसऱ्या क्रमांकावर जॅक कॅलिस असून त्याने १२३०५ धावा केल्या आहेत. तर चौथ्या क्रमांकार श्रीलंकेच्या संघाचा माजी कर्णधार कुमार संगकारा असून त्याने १२०४३ धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com