ruturaj gaikwad instagram
Sports

Ruturaj Gaikwad News: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत ऋतुराजला धोनीचा गुरुमंत्र ठरला फायदेशीर, स्वत: केला खुलासा

Ruturaj Gaikwad on Mahendra Singh Dhoni : ऋतुराजने मालिकेतील या चांगल्या कामगिरीचं श्रेय टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला दिलं. तसेच यावेळी ऋतुराजने मोठा खुलासाही केला.

Vishal Gangurde

India Vs Australia T20 Series Ruturaj Gaikwad:

ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध टी-२० मालिकेत भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड जबरदस्त फॉर्ममध्ये होता. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये मालिकेमधील ४ टी-२० सामने झाले आहेत. या चार सामन्यात ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने या मालिकेत पहिलं आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं आहे. ऋतुराजने मालिकेतील या चांगल्या कामगिरीचं श्रेय टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला दिलं. तसेच यावेळी ऋतुराजने मोठा खुलासाही केला. (Latest Marathi News)

क्रिकेटचे बारकावे समजले : गायकवाड

ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध चौथ्या टी-२० सामन्यानंतर ऋतुराज गायकवाडने म्हटलं की, 'आयपीएलमध्ये सीएसकेसाठी खेळताना धोनीच्या नेतृत्वात टी-२० क्रिकेटचे अनेक बारकावे समजले. सीएसकेसाठी खेळताना टी-२० फॉरमॅटविषयी खूप काही शिकलो. धोनी परिस्थिती समजून घेण्यासाठी नेहमी तत्पर असतो'.

धोनीने दिला गुरुमंत्र

ऋतुराज गायकवाड पुढे म्हणाला, 'महेंद्र सिंह धोनीचा कानमंत्र हा असतो की, संघाची धावसंख्या पाहून निर्णय घ्या की, गरज काय आहे? तेव्हा सामन्यात कोणतीही परिस्थिती असेल. तुम्हाला टी-२० सामन्यात मानसिकदृष्ट्या खेळात पुढे राहावं लागतं. मी त्याला खूप महत्व देतो'.

'मी सामन्याआधीच विचार केला होता की, डावात कशी परिस्थिती असेल. खेळपट्टी कशी असेल. मी मालिकेत धोनीच्या कानमंत्रावर काम केलं. मनाला अधिक भरकटू दिलं नाही. टी-२० सामन्यात सलामीवीर फलंदाजाला खेळण्यसाठी वेळ मिळतो, असं ऋतुराजने सांगितलं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय क्रिकेट चाहत्यांना दिली आनंदाची संधी : गायकवाड

'विश्वचषकात टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर क्रिकेट चाहते नाराज झाले होते. या मालिकेमुळे त्यांना आनंदाची संधी मिळाली. सर्वांनी मन व्यक्त करायला हवं, तसेच खेळाचा आनंद घेतला पाहिजे. खेळाडूंनी प्रत्येक टप्प्यावर जबाबदारी पार पडली. त्यामुळे मालिकेतील निकालावर खूश आहोत. आता मालिकेचा फक्त एकच सामना शिल्लक आहे, असंही ऋतुराजने सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT