बांगलादेशने न्यूझीलंडचा पहिल्या कसोटी सामन्यात पराभव करत इतिहास रचला आहे. सिलहटमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडचा 150 धावांनी पराभव केला.
या विजयासह 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशने 1-0 अशी आघाडी घेतली. या ऐतिहासिक विजयासह बांगलादेशने आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट टेबलमध्ये भारताला मागे टाकले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर बांगलादेशचे 12 गुण झाले आहेत. ज्यामुळे बांगलादेश आता WTC पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर भारत (Team India) तिसऱ्या स्थानावर ढकलला गेला आहे. भारताचे 16 गुण असले तरी विजयाच्या टक्केवारीत बांगलादेश जागतिक कसोटी क्रमवारीत नंबर 1 टीम इंडियाच्या पुढे आहे.
ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड अनुक्रमे पुढील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंटटेबलमध्ये पाकिस्तान संघ 24 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशची विजयाची टक्केवारी 100-100 आहे, तर भारताची टक्केवारी 66.67 आहे. (Latest Marathi News)
न्यूझीलंडची फलंदाजी बांगलादेशचा डावखुरा गोलंदाज तैजुल इस्लामच्या फिरकीत अडकली. त्याने् 75 धावांत 6 विकेट घेतल्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने विजयासाठी 332 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 113 धावांपर्यंत मजल मारत सात विकेट गमावल्या होत्या.
यानंतर 5व्या दिवशी न्यूझीलंडचा संपूर्ण संघ दुसऱ्या डावात 181 धावांवर गडगडला. याआधी बांगलादेशने पहिल्या डावात 310 आणि दुसऱ्या डावात 338 धावा केल्या होत्या. किवी संघाने पहिल्या डावात 317 धावा केल्या होत्या.
बांगलादेशचा न्यूझीलंडविरुद्ध 18 सामन्यांतील हा दुसरा कसोटी विजय ठरला. बांगलादेशने याआधी 2022 मध्ये न्यूझीलंडचा पराभव केला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.