TEAM INDIA twitter
Sports

IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

Team India Playing XI Prediction For IND vs AUS 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

IND vs AUS: बॉर्डर - गावसकर मालिकेआधी ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं आहे. मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच संघातील स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. शुभमन गिलच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.

तर सराव करत असताना केएल राहुललाही दुखापत झाली होती. आता तो फिट झाला असल्याचं म्हटलं जात आहे. सर्वात मोठी टेन्शन वाढवणारी बातमी म्हणजे, कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे प्लेइंग ११ मध्ये कोणाला स्थान द्यायचं? या प्रश्नामुळे टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलं आहे.

रोहितने काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की, तो पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नसेल. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी ही जसप्रीत बुमराहकडे असणार आहे. या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जयस्वालसह केएल राहुलला संधी दिली जाऊ शकते.

मधल्या फळीत कोणाला मिळणार स्थान?

या मालिकेत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. तर यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत आणि सरफराज खानलाही प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. यासह ध्रुव जुरेलचाही प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो.

अष्टपैलू खेळाडू म्हणून रविंद्र जडेजाला संधी दिली जाऊ शकते. तर अश्विनला विश्रांती दिली जाऊ शकते. यासह देवदत्त पडिक्कललाही बॅकअपसाठी संघात स्थान दिलं गेलं आहे. गरज पडल्यास त्यालाही संघात स्थान दिले जाऊ शकते.

या गोलंदाजांना मिळू शकते संधी

या मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहसह मोहम्मद सिराजला संधी दिली जाऊ शकते. तर गोलंदाजीचा तिसरा पर्याय म्हणून वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संधी दिली जाऊ शकते.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), सरफराज खान, विराट कोहली, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), के.एल. राहुल, हर्षित राणा, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Idea: कार नसतानाही करा OLA-Uberसोबत व्यवसाय; दरमहा कमवा बक्कळ पैसा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Banana Chips: वेफर्स खाताय सावधान! तुम्ही खाताय सडलेल्या केळीचे वेफर्स

Mumbai Ahmedabad Bullet Train: समुद्राखालून ३२० किमी वेगाने धावेल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, जाणून घ्य कसा असेल मार्ग

Shocking : ३१ वर्षांच्या तरुणाने केली हद्दपार, १००० महिलांसोबत शरीरसंबध, पण आता...; जगभरात होतेय चर्चा

NEET Exam: 'नीट'चं टेन्शन, विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन; विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT